इंडेक्स फंड

इंडेक्स फंड

नवशिक्या गुंतवणुकदारांनी शेअर बाजाराच्या चढ-उतारा कडे दुर्लक्ष करून इंडेक्स फंडात नियमितपणे ठराविक रकमेची दीर्घ मुदतीसाठी गुंतवणुक करावी आणि पैशाची गरज पडेल तेव्हाच विक्री करावी. तज्ञ मंडळी यालाच डॉलर कॉस्ट एव्हरेजिंग किंवा रूपी कॉस्ट एव्हरेजिंग असे म्हणतात. यामुळे गुंतवणुकदाराची खरेदीची सरासरी किंमत कमी कमी होत जाते.
सेन्सेक्स किंवा निफ्टी सारख्या निर्देशांकाची हुबेहूब नक्कल करणा-या मुच्युअल फंड योजनेला इंडेक्स फंड म्हणतात. हे फंड तुमच्या कडून घेतलेले पैसे, त्या इंडेक्स मधील ३० किंवा ५० शेअर मध्ये इंडेक्समध्ये त्या त्या शेअरच्या असलेल्या वेटच्या प्रमाणातच गुंतवतात.
अशा इंडेक्स फंडा मध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम दीर्घ काळासाठी ( १० वर्षा पेक्षा अधिक ) गुंतवीत राहिल्याने पुढील फायदे होतात.

१) दरमहा नियमित गुंतवणुक करण्याची सवय लागते.

२) शेअर बाजारात मिळणा-या भरघोस परताव्याचा लाभ मिळतो.

३) एकाच अल्पशा रकमेत ३० किंवा ५० ब्ल्यू चीप शेअर खरेदी केल्यासारखे होते.

४) शेअर बाजारातील चढ – उताराचा मनावर अनिष्ट परिणाम होत नाही.

५) थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे १० वर्षांनंतर चांगली रक्कम जमा होते.

६) निर्देशांक खाली असताना जास्ती आणि वाढला असताना कमी युनिट्स खरेदी झाल्यामुळे युनिट्स ची सरासरी किंमत कमी होते.

७) इंडेक्स फंडाचा व्यवस्थापनाचा खर्च कमी असल्यामुळे परतावा चांगला मिळतो.

८) बहुतेक फंड सिस्टीमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लान (एस.आय.पी. – सिप) ही सुविधा देत असल्यामुळे गुंतवणुक करणे सुलभ होते.

शेअर बाजारात गुंतवणुक करण्याची सवड किंवा आवड नसलेल्या, परंतु शेअर बाजारातील उत्तम परताव्याचे आकर्षण असलेल्या व्यक्तीसाठी हि पद्धत खुपच फायद्याची आहे. या पद्धती द्वारे सामान्य गुंतवणुकदार ब-याचशा धंदेवाईक गुंतवणूकदारा पेक्षा किंवा फंड मेनेजर्स पेक्षा चांगला परतावा मिळवू शकतो. या पद्धतीमुळे शेअर बाजारातील चढ उतारामुळे चिंताग्रस्त होण्याची भीती राहत नाही.

Share This Post

Post Comment