इनसाइडर ट्रेडर

इनसाइडर ट्रेडर

सोप्या भाषेत शेअर बाजार (भाग -३) – मितेश ताके

शेअर बाजारात कुठलेही उत्पादन होत नाही, कुठलाही सेवा व्यवसाय चालत नाही. त्यामुळे तेथे संपत्ती निर्माण होत नाही. फक्त संपत्तीचे हस्तांतरण होते. ७०% ते ८५ % लोकांचा पैसा ३०% ते १५ % लोकांकडे जातो.

कोण असतात हे गमावणारे आणि कमावणारे ?
गमावणारे असतात नवखे, आडाणी, बेशिस्त, उथळ, हावरट, जुगारी, मेंढरांची मानसिकता असलेले, अस्थिर, धरसोड करणारे, भित्रे, आडमुठे, दैववादी, अहंमगंड असलेले, हट्टी, शीघ्रकोपी, अविचारी, थ्रील शोधणारे, रटाळ आयुष्याला कंटाळलेले, इ.
आणि
कमावणारे – विचारी, प्रोफेशनल, शिस्त पाळणारे, धोरणी, संयमी, अभ्यासू, चुकांमधून शिकणारे, परिवर्तनशील, चिकाटी असलेले, लवचिक, स्थिरबुद्धी असलेले, इ.

अजून एक वर्ग आहे जो प्रचंड पैसे कमावतो तो म्हणजे भामटे
उदा. इनसाइडर ट्रेडर – कंपन्यांची गुप्त माहिती वापरून शेअरचा भाव वाढेल की कमी होईल हे आधीच माहिती करून घेतात आणि त्याप्रमाणे खरेदी विक्री करतात ; छोटया शेअर्स मध्ये कृत्रिम भाववाढ करणाऱ्या टोळ्या इ. इ.

—————————-
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा –
https://www.facebook.com/StockMarketinSimpleMarathi
—————————-

Posted on एप्रिल 3, 2016
Leave a comment

Share This Post

Post Comment