इस्जेक हेवी इंजिनीयिरग लि

इस्जेक हेवी इंजिनीयिरग लि

वर्ष १९३३ मध्ये सरस्वती शुगर सिंडिकेट लिमिटेड या नावाने सुरू झालेली ही कंपनी. १९४६ मध्ये इंडियन शुगर अँड जनरल इंजिनीयिरग कॉर्पोरेशन (इस्जेक) या साजेशा नावाने व्यवसाय करू लागली. गेल्या ८५ वर्षांत इस्जेकने आपला विस्तार अनेक क्षेत्रांत वाढवत नेला आहे. यात प्रामुख्याने ऊर्जा, ईपीसी, बॉयलर, साखर, स्टील, खत प्रकल्प, तेल आणि वायू, प्रदूषण नियंत्रण अशा विविध महत्त्वाच्या क्षेत्रातील उद्योगांना पूरक मशीनरी तसेच इतर उत्पादने व सेवा पुरवत आहे. भारतात कंपनीचे यमुना नगर, रतनगड, बावल, मुझ्झफरनगर आणि दहेज येथे उत्पादन प्रकल्प आहेत. बॉयलर उत्पादन बाजारपेठेत इसजेकचा ५२ टक्के हिस्सा असून यंदाच्या आर्थिक वर्षांत प्रलंबित ऑर्डरपैकी बहुतांशी ऑर्डर पूर्ण केल्या आहेत. अमेरिकी आणि जर्मन कंपन्यांच्या तांत्रिक सहकार्याने कंपनीने प्रदूषण नियंत्रक उपकरणांचे उत्पादन सुरू केले आहे त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कंपनीने इंडोनेशियामध्ये नुकतीच शुगर रिफायनरी सुरू केली असून दुसरी मोठी शुगर रिफायनरी आखाती देशांत ती उभारत आहे. त्याचा फायदा आखाती देश आणि युरोपीय देशांच्या मागणी पुरवठय़ासाठी करता येईल. याखेरीज कंपनीने उत्तर प्रदेशात नुकताच एक फार्मास्युटिकल शुगर प्रोजेक्ट कार्यान्वित केला आहे.

इस्जेकच्या ग्राहकांच्या मांदियाळीत अनेक नामांकित कंपन्यांचा संमावेश होतो. यात प्रामुख्याने अल्स्टोम, ब्रिटिश पेट्रोलियम, इंडियन ऑइल, तोशिबा, टोयो, सुमिटोमो, वाइथ, वालीओ, फॉस्टर व्हीलर, पाट्रोफेक, लूर्गी, टेक्निप इ. कंपन्यांची नावे घेता येतील. कायम उत्तम कामगिरी करून दाखवणाऱ्या या कंपनीने सप्टेंबर २०१९ अखेर संपलेल्या तिमाहीसाठी उत्तम कामगिरी करून दाखविली आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत उलाढालीत २३ टक्के वाढ होऊन ती १,४३०.५४ कोटी रुपयांवर गेली आहे, तर नक्त नफ्यात तब्बल ५९ टक्के वाढ होऊन तो ४५.१३ कोटींवर गेला आहे. मंदीसदृश वातावरणातही कंपनी उत्तम कामगिरी करीत असून न्यूक्लियर, डिफेन्स, प्रोसेस इक्विपमेंट तसेच टय़ूबिंग व पाइिपग आदी व्यवसायांतून भरीव कामगिरी अपेक्षित आहे. ‘फॉच्र्युन इंडिया ५००’ मध्ये समावेश असलेली इस्जेक हेवी इंजिनीयिरग तुमच्या पोर्टफोलियोसाठी फायद्याची खरेदी ठरू शकते.

यंदाच वर्ष कसं गेलं आणि येणार नवीन वर्ष कसं असेल याबद्दल सविस्तर पुढच्या लेखात..

इस्जेक हेवी इंजिनीयिरग लि.

शुक्रवारचा बंद भाव : रु. ३३७.६०

(बीएसई कोड – ५३३०३३)

स्मॉल कॅप समभाग

व्यवसाय : औद्योगिक मशीनरी, ईपीसी

बाजारभांडवल:  रु. २,६०० कोटी

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: रु.  ६२२/३०६

भागभांडवल:  रु. ७.३५ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक    ६२.२७

परदेशी गुंतवणूकदार  १.८४

बँक्स/ म्यु. फंड/ सरकार   ११.२८

इतर/ जनता    २४.६१

पुस्तकी मूल्य : रु.२१४.१८

दर्शनी मूल्य :   रु. १/-

लाभांश :  ८५०%

प्रति समभाग उत्पन्न :    रु. १८.९४

पी/ई गुणोत्तर : १७.६

समग्र पी/ई गुणोत्तर :    १४

डेट इक्विटी गुणोत्तर :    ०.३१

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : ७.६१

रिटर्न ऑन कॅपिटल : १५.२४

बीटा :    १

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

Share This Post

Post Comment