एक नको असलेले मुल ते जगातील अब्जाधिष लॅरी एलीसन्‍ ( Larry Ellison)

एक नको असलेले मुल ते जगातील अब्जाधिष लॅरी एलीसन्‍ ( Larry Ellison)

एक नको असलेले मुल ते जगातील अब्जाधिष
लॅरी एलीसन्‍ ( Larry Ellison)
उल्हास हरी जोशी

लॅरी एलीसन! जगातील 5 व्या क्रामांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती! वय्‍ 66! Oracle या जगप्रसीद्ध्‍ कंपनीचा संस्थापक! संपत्ती 39.5 अब्ज डॉलर्स म्हणजे 1775 अब्ज रुपये!( 1 अब्ज म्हणजे 100 कोटी)
ही झाली नाण्याची एक बाजु! नाण्याची दुसरी बाजु?
लॅरीचा जन्म एक नको असलेले मुल म्हणुन झाला! त्याच्या आईचे नांव फ्लोरेन्स स्पेलमन. ती 19 वयाची कुमारी माता होती.17 ऑगस्ट 1944 साली त्याचा जन्म न्युयॉर्क ( New York) राज्यात झाला. त्याचा बाप एअर फोर्स मधील ईटालीयन अमेरीकन पायलट होता. त्याने आपल्या प्रेयसीला फसवले. त्यामुळे फ्लोरेन्सला हे मुल नकोसे झाले होते. पण तिला नाईलाजाने या मुलाला जन्म द्यावा लागला व कुमारी माता व्हावे लागले. ती एक गरीब तरुणी होती. कशीबशी गुजराण करीत होती. तिला या नको असलेल्या मुलाला सांभाळणे जड जात होते. हे मुल 9 महीन्यांचे असताना त्याला न्युमोनीयाने पछाडले. आता तर या मुलाचा सांभाळ करणे अशक्य झाले. ती तर हे मुल टाकुनच द्यायला निघाली होती. पण शिकागोला असलीली तिची मावशी मदतीला आली. तिने हे मुल दत्तक घेतले. या मावशीचे नांव लिलीयन्‍ एलीसन. लुई एलीसन हा तिचा नवरा. लिलीयन ही त्याची दुसरी बायको! अशा रीतीने या मुलाचे लॅरी एलीसन म्हणुन बारसे झाले. पुढे लॅरी वयाच्या 48 व्या वर्षी आपल्या खर्‍या आईला भेटला. त्याची आणि त्याच्या खर्‍या वडीलांची भेट अजुन पर्यंत झालेली नाही.लॅरीचा दत्तक बाप लुई हा रशीयातुन आलेला एक ईमीग्रंट होता. तो एक सरकारी नोकर होता आणि शिकागो मधील एका गरीब, मध्यम वर्गीय वस्तीत रहात होता. त्यामुळे लॅरीचे सगळे बालपण या गरीब आणि मध्यमवर्गीय वस्तीतच गेले. वयाच्या 12 व्या वर्षी त्याला आपले आई वडील ख्ररे नसुन दत्तक आहेत हे समजले.

लॅरीची दत्तक आई प्रेमळ होती. पण त्याचा दत्तक बाप मात्र फार खाष्ट आणी अब्युजीव्ह होता. तो नेहमी लॅरीला शिव्या देत असे. त्याचा ‘ गन्दे नाली का कीडा. तुझी काही लायकीच नाही. तू आयुष्यांत कांहीच करु शकणार नाहीस!’ म्हणुन वारंवार अपमान करीत असे. पण वडीलांच्या या अशा अपमानास्पद वगणुकीमुळेच लॅरीच्या मनांत काहीतरी बनुन दाखवीण्याची ईर्षा नीर्माण झाली. लॅरी आपल्याला जे कांही यश मिळाले आहे त्याचे श्रेय आपल्या अब्युजीव्ह वडीलांना देतो. लॅरीचे म्हणणे आहे की तुम्हाला आयुष्यात एखादी तरी अशी व्यक्ती भेटायला हवी की जी वारंवार तुमचा अपमान करीत असेल. तुमची लायकी काढत असेल. तुम्ही कुचकामी अहात असे वारंवार छातीठोक पणे सांगत असेल. जो पर्यन्त तुम्हाला अशी व्यक्ती भेटत नाही तो पर्यन्त काहीतरी बनण्याची ईर्षा तुमच्या मनांत निर्माण होत नाही.

लॅरीचे शालेय शीक्षण शिकागोला झाले. शाळेत तो हुशार पण बेशीस्त वीद्यार्थी म्हणुन ओलखला जायचा. शालेय शीक्षण संपल्यावर त्याने अर्बाना शॅम्पेन येथील शिकागो युनीव्हर्सीटीत ऍड्मीशन घीतली. पण तो दुसर्या वर्षाला असताना त्याच्या दत्तक आईचे नीधन झाले.लॅरीच्या मनावर याचा परीणाम झाला. तो या युनीव्हर्सीटीतुन ड्रॉप आऊट झाला. मग उत्तर कॅलीफोर्नीया मधील आपल्या एका मित्राकडे जाउन वर्षभर राहीला. मग परत युनीव्हर्सीटी ऑफ शिकागो मधे ऍड्मीशन घेतली. तिथे पण एक वर्ष काढल्यावर पुन्हा ड्रॉप आउट व्हावे लागले. त्यामुळे शीक्षण अर्धवट राहीले. पण या ठीकाणी एक गोष्ट घडली. येथे लॉरीला कॉंम्प्युटरचा कीडा चावला!

कुमारी मातेचा नको असलेला मुलगा. दत्तक आई बाप. गरीब मध्यमवर्गीय परीस्थीतीत गेलेले बालपण. दत्तक आई नुकतीच गेलेली. शीव्या घालणारा अब्युजीव्हृ बाप. अर्धवट झालेले शीक्षण. खीशात पैसे नाहीत. ही क्वलीफीकीशन्स घेऊन वयाच्या 20व्या वर्षी म्हणजे 1964 साली त्याने सीलीकॉन व्हॅलीत पाउल टाकले ते कायमचे! तसेच आपण काहीतरी बनुन दाखवायचेच ही ईर्षा मनात घेऊनच! आता ख्रर्‍या स्ट्रगलला सुरवात झाली. जे स्ट्रगल करतात देव नेहमीच त्यांच्या पाठीशी उभा असतो. देव अशा लोकांनाच नेहमी प्रगतीची संधी देत असतो. लॉरीला याचा प्रत्येय यायचा होता.
पहीली 9 वर्षे त्याने मिळेल ती नोकरी करण्यात घालवली. त्याचवेळी त्याला C.I.A. या अमेरीकेच्या गुप्तहेर संघटनेच्या डाटा बेस प्रोजेक्टवर काम करायची संधी मीळाली. या प्रॉजेक्ट्चे नांव ओरॅकल असे होते. त्यावेळी डाटा बेस हा नवीन प्रकार उदयाला येत होता. लॉरीने या संधीचे महत्व ओळखले. त्याने तीन मीत्रांच्या सहाय्याने स्वतःच्या कंपनीची स्थापना केली आणि त्या कंपनीला ओरॅकल ( Oracle ) हे नांव दीले. या कंपनीची सुरवात तशी खाच खळ्ग्यातूनच झाली. कंपनी बंद पडते की काय अशी परीस्थीती अनेक वेळा आली. लॅरी कंपनीचा CEOहोता. त्याने प्रत्येक वेळी कंपनीला संकटातुन बाहेर काढले. जस जशी कंपनीची प्रगती होत गेली लॅरीची पण आर्थीक भरभराट होत गेली. सर्वात जास्त मानधन कमावणारा CEO म्हणून लॅरी ओळखला जाऊ लागला. पण जेव्हा मंदी होती तेव्हा याच लॅरीने महीना 1 डॉलर या अत्यल्प वेतनावर पण काम केले आहे. सन 2010 मधे ओरॅकल चे नांव एकदम प्रसीद्धीच्या झोतात आले ते वेगळ्या कारणामुळे. ओरॅकलने सन मायक्रो सीस्टीम ही कंपनी टेक ओव्हर केली तेव्हा! सन मायक्रो ही कंपनी टेक ओव्हेर करायला आय्‍. बी. एम्‍.( I.B.M.) आणी एच्‍. पी. ( Hewlett-Packard ) या दोन मोठ्या आणी दिग्गज कंपन्या उत्सुक होत्या. या कंपन्यांशी टक्कर देऊन ओरॅकलने सन मयक्रोवर ताबा मीळवीला.
सन 2005 पासुनच ल्यॅरीचे नांव जगातील श्रीमंत व्यक्तींमधे घेतले जाऊ लागले. फोर्बज या मासीकाने जगातील अब्जाधीशांची जी यादी अलीकडे प्रसीध्ध केली आहे त्या यादीप्रमाणे लॅरी एलीसन हा जगातील 5 व्या क्रमांकाचाः अमेरीकेतील 3 र्‍या क्रमांकाचाः तर कॅलीफोर्नीयातील 1 ल्या क्रमांकाचा श्रीमंत माणुस आहे. स्वतहःची खाजगी वीमाने असलेला सीलीकॉन व्हॅलीतील पहीला ऊद्योजक आहे. त्याची 4 लग्ने झाली असुन त्याला दोन मुले आहेत. त्याची मुले हॉलीवुड मधील चीत्रपट क्षेत्रात कार्यरत आहेत. लॅरी त्याच्या ऊध्धट स्वभावाबद्दल पण प्रसीध्ध आहे.ऍपल चा CEO
स्टीव्ह जॉब्ज ( Steve Jobs) त्याचा खास दोस्त. कांही वर्षांपुर्वी ऍपलच्या डायरेक्टर बोर्डाने स्टीव्ह जॉब्जची ह्कालपट्टी केली होती. तेव्हा लॅरीने ऍपल च्या डायरेक्टर बोर्डाची ‘मूर्खांचा बाजार’ म्हणुन संभावना केली होती.त्यानंतर एच. पी. च्या बोर्डाने लॅरीचा दुसरा मीत्र मार्क हर्ड ( Mark Hurd )याची सी.ई.ओ. पदावरुन हकालपट्टी केली तेव्हा लॅरीने ‘ कांही वर्षांपुर्वी जो गाढवपणा ऍपलच्या लोकांनी केला तोच गाढ्वपणा आता एच्‍.पी. च्या लोकांनी केला आहे’ असे उदगार काढले. त्यामुळे लॅरी हा नेहमीच कुठल्या ना कुठल्यातरी वादात अड्कलेला असतो. लॅरीला समुद्र प्रवासाची आवड आहे. जगातले 6 व्या क्रमांकाचे सर्वात मोठे खाजगी जहाज ( Yatch )त्याच्या मालकिचे आहे. तसेच तो उत्तम टेनीस पटू आहे. त्याचे म्हणणे आहे की जर तो उद्योजक झाला नसता तर उत्तम टेनीस खेळाडू झाला असता. 28 एकर क्षेत्र असलेल्या जमीनीत पसरलेली त्याची ईस्टेट आणि जपानी पध्धतीने सजवलेले त्याचे घर हा लोकांच्या कुतुहलाचा वीषय झाला आहे.
तर आसा हा लॅरी एलीसनचा नको असलेले मुल ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असा थक्क करणारा प्रवास! लॅरीचे म्हणणे आहे की आयुष्यात संकटे ही यायलाच हवीत. संघर्ष हा घडायलाच हवा. चुका या व्हायलाच हव्यात. तुमची नीर्भत्सना करणारा कोणी ना कोणी तरी माणुस हा भेटायलाच हवा. त्याशीवाय प्रगती करण्याची ईर्षा नीर्माण होत नाही. लॅरी एलीसनने हे सप्रमाण सीध्ध करुन दाखवले आहे.
‘ श्रीमंतीचा एक मोठा फयदा असतो! तुम्हाला जे पाहीजे ते तुम्ही मीळवू शकाता. त्यामुळे प्रत्येकाने श्रीमंत व्हावे असे माझे स्ट्रॉंन्ग रेकमंडेशन आहे. पण त्यासाठी तुमच्या मनांत श्रीमंत होण्याची तीव्र ईच्छाशक्ती आणि ईर्षा हवी. अर्थातच याला योग्य प्रयत्नाची जोड पण असायला हवी. कारण जगात कोणालाही श्रीमंत बनणे शक्य आहे’ असे लॅरीचे सांगणे आहे.
आपण यातुन काय धडा घेऊ शकतो

Share This Post

Post Comment