एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड

एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड

काही कंपन्या फंडामेंटली इतक्या मजबूत असतात की, त्या कंपन्यांबद्दल विशेष काही अभ्यासाची गरज नसते. आज सुचविलेली एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही त्या पैकीच एक. १९७६ मध्ये शिव नाडर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने हिंदुस्तान कॉम्प्युटरची स्थापना केली. १९९१ ते १९९९ दरम्यान कंपनीने आपला सॉफ्टवेअर व्यवसाय मोठय़ा प्रमाणात विस्तारत अमेरिका तसेच युरोपसह इतर देशांत नेला. १९९९ मध्येच कंपनीने आपल्या मुख्य व्यवसायानुसार कंपनीचे नामकरण एचसीएल टेक्नॉलॉजीज केले. कंपनीने गेल्या ४३ वर्षांत मोठी कामगिरी करत आपल्या कक्षाही मोठय़ा प्रमाणात विस्तारल्या आहेत. आपल्या भागधारकांना कायम उत्तम परतावा देणाऱ्या एचसीएल टेक्नॉलॉजीजने नुकताच १:१ प्रमाणात बोनस भागांचे वाटप केल्यामुळे कंपनीचे भरणा झालेले भागभांडवल वाढून शेअरचा बाजाभावही निम्म्यावर आला आहे.

एचसीएल टेक्नॉलॉजीज ही पुढील पिढीची जागतिक तंत्रज्ञान कंपनी आहे जी नवीन कंपन्यांना डिजिटल युगासाठी त्यांच्या व्यवसायांचे पुनर्निर्माण करण्यास मदत करते. कंपनीची तंत्रज्ञान उत्पादने, सेवा आणि अभियांत्रिकी चार दशकांच्या नवनिर्मितीवर तयार केली गेली आहे ज्यात जागतिक कीर्तीचे व्यवस्थापन, आविष्कार आणि जोखीम घेण्याची क्षमता आणि ग्राहक संबंधांवर लक्ष केंद्रित केले आहे. कंपनीने विविध सेवा पुरवणाऱ्या जगभरातील अनेक कंपन्या  ताब्यात घेऊन आपले विस्तारीकरण केले आहे.

एचसीएलच्या उत्पादनात आणि विविध सेवांत डिजिटल, आयओटी, क्लाऊड, ऑटोमेशन, सायबर सिक्युरिटी, अ‍ॅनालिटिक्स, इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेन्ट आणि अभियांत्रिकी सेवांचा समावेश होतो. जगभरातील अमेरिका, युरोपसह ४४ देशांत सुमारे ६५० आघाडीच्या कंपन्यांना आपल्या सेवा पुरवणाऱ्या एचसीएल टेक्नॉलॉजीजमध्ये १४७,०००हून अधिक तंत्रज्ञ कार्यरत आहेत. भारतातील पहिल्या मोठय़ा २० आघाडीच्या कंपन्यांत गणली जाणाऱ्या एचसीएल टेक्नॉलॉजीजचा फोर्ब्स ग्लोबल २००० कंपन्यांच्या पंक्तीत समावेश आहे.

गेली अनेक वर्षे कंपनी सातत्याने उत्तम कामगिरी करत असून आगामी काळातदेखील कंपनी भरीव कामगिरी करून दाखवेल अशी अपेक्षा आहे. सप्टेंबर २०१९ साठी संपलेल्या तिमाहीत कंपनीने ८,१३० कोटी रुपयांच्या उलाढालीवर २,२३२ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो केवळ चार टक्क्यांनी अधिक आहे.

केवळ ०.३ बिटा असलेला हा शेअर एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून तुम्हाला चांगला फायदा देऊ शकेल.

एचसीएल टेक्नॉलॉजीज लि.

(बीएसई कोड – ५३२२८१)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ५७०

लार्ज कॅप समभाग

प्रवर्तक : शिव नाडार

व्यवसाय : आयटी, सॉफ्टवेअर

बाजार भांडवल : रु. १५४,५४३ कोटी

वर्षभरातील उच्चांक/नीचांक : रु.  ५९५ / ४६०

भागभांडवल : रु.  ५४२.७३ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक    ६०.००

परदेशी गुंतवणूकदार  २७.९६

बँक/ म्यु. फंड/ सरकार    ८.६३

इतर/ जनता    ३.४१

पुस्तकी मूल्य : रु. ११२.२

दर्शनी मूल्य :   रु. २/-

लाभांश : ४००%

प्रति समभाग उत्पन्न :    रु. २९.४

पी/ई गुणोत्तर :     १५.३

समग्र पी/ई गुणोत्तर :    १८.५

डेट इक्विटी गुणोत्तर :    ०.१७

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :     ३७.७७

रिटर्न ऑन कॅपिटल : ३०.६७

बीटा :    ०.३

Share This Post

Post Comment