कॅनस्लीम ( CANSLIM )

कॅनस्लीम ( CANSLIM )

शेअर बाजारात महत्वाचे असते ते म्हणजे योग्य शेअरचे सिलेक्शन. प्रत्येक गुंतवणुकदाराला वाटते की आपल्याकडे एक तरी मल्टीबेगर शेअर हाती लागावा आणि त्याची किंमत २-३ वर्षात ५-१० पट व्हावी.
यासाठी गुंतवणुक गुरु विल्यम ओनील यांनी १९५३-१९८५ या तीन दशकातील मल्टीबेगर ठरलेल्या शेअर्सचा सखोल अभ्यास करून एक पुस्तक लीहीले, ‘हाऊ टू मेक मनी इन स्टोक्स’ हे पुस्तक इंटरनेशनल बेस्ट सेलर ठरले. या पुस्तकात त्यांनी अशा शेअरची सात ठळक वैशिष्ट्ये सांगितली आहेत. त्याची आद्याक्षरे घेऊन एक नियम मांडला तो म्हणजे कॅनस्लीम

C- Curreent Quarterly Earnings

A : Annual Earnings Growth

N : New product, New Management,
New High

S : Shares Outstanding

L : Leader

I : Institutional Owenership

M: Market direction

1) CURRENT QUARTERLY EARNINGS :

विल्यम ओनील सांगतात की, शेअर निवडताना त्या शेअरच्या सध्याच्या तिमाही ई.पी.एस. ची तुलना गेल्या वर्षीच्या त्याच तिमाहीतील प्रति शेअर नफ्या बरोबर (ई.पी.एस) करून पहावी. सध्याचे ई.पी.एस. गेल्या वर्षीच्या तुलनेत कमीत कमी १८-२० टक्क्याने वाढलेले असावे. ओनील यांनी संशोधन केलेल्या शेअर पैकी ७५ % कंपन्याचे त्रैमासिक प्रतिशेअर नफा सुमारे ७० % वाढलेला होता. कंपन्या आपली तिमाही कामगिरी जाहीर करताना ही तुलना देत असतात.

2) ANNUAL EARNINGS GROWTH :

गुंतवणुकीच्या दृष्टीने विचाराधीन असलेल्या क्म्प्निचा प्रतिशेअर नफा गेल्या ५ वर्षात दरवर्षी कमीत कमी १५ % वाढलेला असावा. शक्यतो नफा दरवर्षी वाढलेला असावा. परंतु एखाद्या वर्षी काही कारणाने तितका वाढला नसल्यास नंतरच्या वर्षात त्याची भरपाई केलेली असावी. तसेच येणा-या एक-दोन वर्षात देखील वाढीचा दर असाच कमीत कमी १५ % राहण्याची शक्यता असावी. www.icicidirect.com या वेबसाईट वर अथवा कॅपिटल मार्केट च्या ‘काम्पेडीयाम ऑफ टोप ५०० कंपनीज इन इंडिया’ या पुस्तकात कंपन्याची गेल्या ५ वर्षातील कामगिरी दिलेली असते.

3) NEW PRODUCT, NEW
MANAGEMENT,NEW HIGH :
शेअर बाजाराला सतत काहीतरी नवीन पाहिजे असते. मग ती नवीन वस्तू असो, नवीन तंत्रज्ञान असो, नवे व्यवस्थापन असो, अथवा शेअरच्या भावाचा नवा उच्चांक असो, उदा. टीव्हीएस कम्पनीच्या ‘व्हिक्टर’, बजाज ऑटोच्या ‘पल्सर’ तर हिरो होंडाच्या ‘स्प्लेंडर’ या नव्या प्रोडक्टमुळे या कंपन्याच्या शेअरचे भाव चांगले वाढले. बी.एस.ई.एस. आणि व्ही.एस.एन.एल. चे व्यवस्थापन अनुक्रमे अंबानी आणि टाटा समुहाने घेतल्यानंतर त्या कंपन्याचे भाव झपाट्याने वाढले.
सामान्यपणे सर्वसामान्य गुंतवणूकदार ‘बाय लो & सेल हाय’ हे तत्व पाळताना दिसतात. म्हणजे शेअरचा भाव कमी झाला की खरेदी करतात आणि वाढला की विकतात. गुंतवणुक गुरु ओनील मात्र सांगतात की, एखादा शेअर दोन महिन्यापासून १५ महिन्यापर्यंत मर्यादित किंमतपट्ट्यात राहून नंतर त्याने नवा उच्चांक गाठला की, तो खरेदी करा म्हणजेच बाय हाय & सेल हाय.

4) SHARES OUTSTANDING :
ओनील सांगतात की, ज्या कंपन्या समभागांची संख्या मर्यादित ठेवून दरवर्षी अधिकाधिक नफा कमवितात, त्या गुंतवणुकीला उत्कृष्ट असतात. बाजारात खरेदी-विक्रीला उपलब्ध अशा समभागाची संख्या वाढली तरी त्याचा भाव झपाट्याने वाढू शकतो.

5) LEADER :

ओनील सांगतात की, ‘परचेस अ लीडिंग स्टोक इन अ लीडिंग इंडस्ट्री’ म्हणजे ज्या उद्योगाचा भविष्यकाळ उज्वल आहे, अशा उद्योगातील नंबर वन कंपनीत गुंतवणुक करा आणि पाठीमागे रेंगाळणा-या कंपन्याकडे दुर्लक्ष करा.

6) INSTITUTIONAL OWNERSHIP :

दर्जेदार म्युच्युअल फंड, पेन्शन फंड, इन्श्युरन्स कंपन्या, एफ.आय.आय. हे खूप मोठ्या प्रमाणावर आणि कंपन्याचा सखोल अभ्यास करूनच गुंतवणुक करीत असतात. त्यामुळे ज्या कंपनीत सुमारे ३ – १० चांगल्या संस्थांनी गुंतवणुक केलेली आहे, अशा कंपन्याचे शेअर खरेदी करणे सुरक्षित असते. परंतु एखाद्या कंपनीचे ७० – ८० % समभाग संस्थांकडे असल्यास तो शेअर वेगाने खाली – वर होऊ शकतो; हे मात्र जरूर ध्यानात ठेवावे.

7) MARKET DIRECTION :

बाजारातील सुमारे ७५% शेअर मार्केट प्रमाणे वर खाली होत असतात. तेव्हा मार्केटचा काळ बघुनच गुंतवणुक करा. मार्केट बुल फेज मध्ये असतानाच खरेदी करावी.

वरील प्रमाणे काही मुलभूत तर काही तांत्रिक मुद्द्याचा वापर करून बनविलेली सोपी, सुटसुटीत परंतु परिणामकारक अशी गुंतवणुक गुरु ओनील यांची कॅनस्लीम पद्धत म्हणजे शेअर बाजारात उत्कृष्ट परतावा मिळविण्याची ‘गुरुकिल्ली’ आहे.

Share This Post

Post Comment