शेअर बाजार (भाग -१२ ) – मितेश ताके
शेअर बाजारात सुरवातीला जे शब्द येतात त्यातील थोडे आता समजून घेऊ.
कॅप – कॅप म्हणजे कॅपिटल/ कॅपिटलायझेषण मराठीत भांडवल.
मार्केट कॅप – कंपनीचे एकूण शेअर्स गुणिले आताचा शेअर बाजारातील चालू भाव.
उदा. एका कंपनीचे एकूण शेअर्स आहेत १०,००,००० आणि आताचा एका शेअरचा भाव आहे २५०० रु. तर त्या कंपनीची मार्केट कॅप झाली (१०,००,००० X २५००) = २५०,००,००,००० अडीचशे कोटी.
कंपनीच्या मार्केटकॅपनुसार ती छोटी, मध्यम, मोठी आणि खूप मोठी असे प्रकार/ वर्गीकरण मानले जाते. त्यांना स्मॉलकॅप, मिडकॅप, लार्जकॅप व ब्लू चीप असे म्हणतात.
खरे तर यांची अशी पक्की व्याख्या नाही. जसे गरीब, मध्यमवर्गीय, श्रीमंत आणि अतिश्रीमंत या शब्दांची पक्की व्याख्या नाही अगदी तसेच.
तरी पण साधारणपणे
२००० कोटी पेक्षा कमी मार्केट कॅप = स्मॉलकॅप
२००० ते १०,००० कोटी मार्केट कॅप = मिडकॅप
१०,००० कोटी पेक्षा जास्त मार्केट कॅप = लार्जकॅप
आणि या लार्जकॅपपैकीच ज्या कंपन्या भारतभर प्रसिध्द आहेत. ज्यांचा कारभार चांगला आहे. नफा कमावतात. शेअरधारकांना डिविडंड वाटतात. इ.इ. त्यांना ब्लू चीप म्हणतात.
( ब्लू चीप हा शब्द कसिनो मध्ये वापरतात. तेथे विविध रंगाच्या चकत्या/ बिल्ले असतात. रंगाप्रमाणे त्यांची किंमत कमी जास्त असते. निळ्या रंगाच्या चकत्या सर्वात किमती असतात. म्हणून सर्वात किमती शेअर = ब्ल्य चीप शेअर )
—————————-