क्लासेस

क्लासेस

सोप्या भाषेत शेअर बाजार (भाग -८) – मितेश ताके
फॉरेक्समध्ये ट्रेडिंग करा म्हणून सारख्या जाहिराती येत असतात आणि आपल्याला मोहात पाडत असतात. त्याचे क्लासेस घेणारे पण खूप आहेत. खरेतर या सर्वांवर बंदी घातली पाहिजे कारण करन्सी /फॉरेक्स ट्रेडिंग करणे भारतात बेकायदेशीर आहे. क्लासवाल्यांना फी तर मिळतेच पण त्यांना आपले अकाउंट परदेशी ब्रोकरकडे उघडून दिल्याबद्दल त्यांच्याकडून खूप मोठे कमिशन पण मिळते.
जर करन्सीमध्ये ट्रेडिंग करायचेच असेल तर भारतात कायदेशीर मान्यता असलेल्या करन्सी डेरेवेटीवमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर ट्रेडिंग करू शकता. पण त्यात खूप ट्रेडर नसतात. “लिक्विडीटी” नसते. आपल्याला जेव्हा विकायचे असते तेव्हा समोर खरेदीदार नसतो. त्यामुळे मी त्याचा सल्ला देणार नाही. त्याऎवजी शेअर्स किंवा कमोडीटीमध्ये ट्रेडिंग करा. कमोडीटीचा मला अनुभव नाही त्यामुळे त्याविषयी मी फार काही सांगू शकत नाही. मात्र तेथे पण “टेक्निकल अॅनॅलीसीस” व “फंडामेंटल अॅनॅलीसीस”चाच उपयोग करावा लागतो. मला मात्र शेअर बाजाराचा अनुभव आहे. येथे अभ्यासाने पैसा कमावता येतो हे मी स्वअनुभवाने सांगू शकतो. खरेतर व्यवस्थित ट्रेडिंग केले तर कुठेही नफा होतो. शेवटी अभ्यास महत्वाचा, मार्केट नाही !

—————————-
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा –
https://www.facebook.com/StockMarketinSimpleMarathi
—————————-

Posted on एप्रिल 8, 2016
Leave a comment

Share This Post

Post Comment