चार्ट कसा पहावा – भाग एक

चार्ट कसा पहावा – भाग एक
चार्ट कसा पहावा – भाग एक*
स्टॉक मार्केट मध्ये कोणावरही अवलंबून न राहता, स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करायची असेल तर चार्ट रिडींग जमणे गरजेचे आहे. चार्ट रिडींग करण्यासाठी काही विशेष शिक्षणाची गरज नाही. प्राथमिक माहिती घेतल्यावर प्रयत्न केल्यास ते जमू शकते त्यासाठी लिहण्याची सवय आणि नंतर काय घडले हे पण पाहणे  महत्वाचे आहे. चार्ट पाहून काय घडले आहे हे तर कळतेच पण काय घडू शकते याचा अंदाज बांधता येतो. अंदाज असल्यामुळे इथे चुकण्याची पण शक्यता असते. पण डोळे झाकून ट्रेड करण्यापेक्षा चार्ट पाहून केलेल्या ट्रेड मध्ये यश चांगले मिळू शकते. आणि स्वकर्तृत्वाचा आनंद हा अवर्णनीय असतो.
चार्ट बनवण्यासाठी कमीत कमी एक म्हणजे CLOSE PRICE माहित असावी लागते . प्रामुख्याने तीन प्रकारचे चार्ट पाहण्यास मिळतात – लाईन चार्ट, बार चार्ट आणि  कॅण्डल स्टिक चार्ट. मी कॅण्डल स्टिक चार्ट वापरतो आणि त्याबद्दल माहिती देणार आहे. कॅण्डल स्टिक चार्ट हा OPEN PRICE, HIGH PRICE, LOW PRICE आणि CLOSE PRICE चा वापर करून बनवला जातो. या मध्ये दोन रंगाच्या कॅण्डल्स दिसतात … लाल आणि हिरवी. जेव्हा OPEN PRICE ही CLOSE PRICE पेक्षा कमी असते तेव्हा कॅण्डल स्टिक चा रंग हिरवा असतो. उदाहरणार्थ जर OPEN PRICE 145.00 आणि CLOSE PRICE 148.00 असेल तर यावेळेस कॅण्डल हिरवी दिसेल. तर जेव्हा OPEN PRICE ही CLOSE PRICE पेक्षा जास्त असते तेव्हा कॅण्डल स्टिक चा रंग लाल असतो. उदाहरणार्थ जर OPEN PRICE  154.00 आणि  CLOSE PRICE 150.00 असेल तर यावेळेस कॅण्डल लाल दिसेल.
एक  मिनिटांपासून ते एक  वर्षाचा किंवा त्यापेक्षाही मोठ्या कालावधीचा चार्ट उपलब्ध असतो. आपण कोणत्या प्रकारचा ट्रेड करू इच्छित यावर कोणत्या कालावधीचा (TIME FRAME) चा चार्ट पहावा हे ठरवायला हवे. तुमचे ट्रेडिंग अकाउंट ज्या ब्रोकर कडे आहे त्यांच्या सॉफ्टवेअर वर चार्ट बघण्याची सुविधा असते तसेच ट्रेडिंग अकाउंट नसले तरी काही WEBSITES, मोफत चार्ट उपलब्ध करून देतात. काही प्रमुख WEBSITES खालिलप्रमाणे –
अधिक माहिती पुढील भागात ….
नितीन पोताडे, मुंबई
9869239959

Share This Post

Post Comment