*चार्ट कसा पहावा – भाग चार

*चार्ट कसा पहावा – भाग चार
*चार्ट कसा पहावा – भाग चार (
भाग 3 मध्ये आपण कोणता  स्टॉक  वर जात आहे तसेच कोणता  स्टॉक  खाली जात आहे हे कसे शोधतात ते जाणून घेतले. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा की कोणत्या प्राईज वर आपण तो  स्टॉक  खरेदी करावा किंवा विक्री करावा हे ठरवणे तसेच घेतलेल्या पोझिशनमध्ये कोणत्या प्राईज वर  स्टॉप लॉस लावावा या दोन्ही गोष्टी सुद्धा आपण  डाऊ थेअरीचा वापर करून शोधू शकतो.
स्विंग हाय ची तुलना करून आपण एखादा  स्टॉक   नवीन नवीन स्विंग हाय बनवत वरती जात आहे का हे पाहून त्याचा अपट्रेन्ड (तेजी ) ओळखण्याचा प्रयत्न करतो तसेच स्विंग हाय मध्ये जर उतरता क्रम असेल तर तो  ट्रेन्ड  हा मंदीचा असू शकतो. याचाच अर्थ स्विंग हाय पाहून सुद्धा आपण मंदीमधील स्टॉक आहे का हे जाणू शकतो आणि स्विंग लो मध्ये चढता क्रम पाहून  स्टॉक तेजीत मध्ये आहे का हे पण ओळखू शकतो.  कधीकधी आपल्याला स्विंग हाय आणि स्विंग लो,  दोन्ही एकाच प्रकारचा म्हणजे चढता क्रम किंवा उतरता क्रम दाखवून त्या स्टॉक चा ट्रेंड ओळखण्यास मदत करतात.
एखादा स्टॉक तेजीमध्ये असल्यास गेल्या स्विंग हाय च्या वरती खरेदी करू शकतो त्याचप्रमाणे स्विंग हाय तोडून प्राईस जर वर गेली तर त्या आधीचा स्विंग लो हा आपला स्टॉप लॉस असू शकतो. तर मंदीचा शेअर्स आपण शोधल्यानंतर स्विंग लोच्या खाली आपण तो स्टॉक विक्रीसाठी चांगला असे मानू शकतो आणि स्विंग लो तोडल्यानंतर त्यापूर्वी असलेला स्विंग हाय हा स्टॉप लॉस ठरवू शकतो. थोडक्यात, डाऊ थेअरीचा वापर करून कोणता स्टॉक तेजी मध्ये किंवा मंदी मध्ये आहे हे शोधणे तसेच असा स्टॉक कधी खरेदी किंवा विक्री केला पाहिजे म्हणजे त्याची एंट्री लेव्हल आपण शोधू शकतो आणि त्याचबरोबर त्याचा स्टॉपलॉस पण आपण शोधू शकतो.
यासाठी सराव करणे फारच महत्त्वाचे ठरते त्यासाठी आपण घेतलेले निर्णय लिहून ठेवावे तसेच त्या स्टॉकध्ये पुढे काय घडले हे ठराविक दिवसानंतर नियमित तपासणे गरजेचे आहे. असे करताना होणाऱ्या चुका कमी करण्यावर आपला भर असला पाहिजे.
चार्ट कसा पहावा चे सर्व भाग लिहून झाले. शेअर मार्केट मध्ये यश मिळावयास तीन M म्हणजे (Method, Money आणि Mind ) बद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न आहे. आता पर्यंतच्या लेखात METHOD बद्दल लिहले. यापुढे MONEY याबद्दल लिहणार आहे. काही बाबी/मुद्धे बाळबोध किंवा साधारण वाटतील पण त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
धन्यवाद.
नितीन पोताडे, मुंबई
9869239959

Share This Post

Post Comment