*चार्ट कसा पहावा – भाग तीन

*चार्ट कसा पहावा – भाग तीन
*चार्ट कसा पहावा – भाग तीन
यापूर्वी चार्ट रेडींग संदर्भात दोन लेख लिहिले आहेत.  मी अपेक्षा करतो  कि ते लेख तुम्ही वाचले असतील. आता मी जे लिहीत आहे ते त्यांनाच समजू शकेल ज्यांना चार्ट रेडींग बद्दल प्राथमिक माहिती आहे.  जर आपण माझे पूर्वीचे दोन लेख वाचले नसतील तर आधी ते वाचावे ही नम्र विनंती.  चार्ट ट्रेडिंग करताना मी डाऊ थेअरी चा वापर करतो. ती एक  जुनी तसेच सोप्पी पद्धत आहे.  या थेअरीमुळे आपल्याला कोणते स्टॉक वरती आहे तसेच कोणते स्टॉक  खाली पडत आहे याची माहिती मिळते. त्यासाठी आपणास स्विंग हाय तसेच स्विंग लो शोधणे जमायला हवे.  ते कसे शोधतात हे सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे.
एखाद्या कॅण्डलचा  हाय, स्विंग हाय समजावा जेव्हा त्या  कॅण्डलचा हाय, जर त्याच्या पूर्वीच्या तीन  कॅण्डलच्या हाय च्यावरती तसेच नंतरच्या तीन कॅण्डलच्या हाय च्या  वरती असेल.  थोडक्यात कमीत कमी सात  कॅण्डल्स पहाव्या लागतात तेव्हा आपल्याला स्विंग हाय शोधणे शक्य होते कारण चौथ्या  कॅण्डलचा हाय  हा पूर्वीच्या तीन  कॅण्डल्स तसेच नंतरच्या तीन कॅण्डल्सच्या हाय च्यावरती असते.  चार्टवर पहाताना आपल्याला कळसासारखे चित्र दिसते.
एखाद्या कॅण्डलचा  लो, स्विंग लो समजावा जेव्हा त्या  कॅण्डलचा लो, जर त्याच्या पूर्वीच्या तीन कॅण्डलच्या लो च्या खालती तसेच नंतरच्या तीन कॅण्डलच्या लो च्या खालती असेल.  थोडक्यात कमीत कमी सात कॅण्डल्स पहाव्या लागतात तेव्हा आपल्याला स्विंग लो शोधणे शक्य होते कारण चौथी कॅण्डलचा लो  ही पूर्वीच्या तीन कॅण्डल्स तसेच नंतरच्या तीन कॅण्डल्सच्या लो  च्याखालती असते.  चार्टवर पहाताना आपल्याला इंग्रजी V सारखे चित्र दिसते.
जेव्हा दोन स्विंग हाय आपल्याला मिळतात आणि सध्याच्या कॅण्डलच्या जवळ असलेला स्विंग हाय हा त्यापूर्वीच्या स्विंग हाय च्या वरती असेल तर तो स्टॉक तेजीत किंवा बुलीश आहे असे मानण्यास हरकत नाह. तसेच जेव्हा दोन स्विंग लो आपल्याला मिळतात आणि सध्याच्या कॅण्डलच्या जवळ असलेला स्विंग लो पूर्वीच्या स्विंग लो पेक्षा खाली असेल तर तो स्टॉक्स मंदीत किंवा बेरिश आहे असे मानण्यास हरकत नाही.
स्विंग हाय/स्विंग लो शोधण्यासाठी आपल्याला सराव करावा लागेल त्यासाठी आपण कोणत्याही टाईम फ्रेमचा म्हणजे कालावधीचा वापर करू शकता. हे नियम मी माझ्याकरता बनवले आहे आणि त्यासाठी गूगलफायनान्स कडून मिळणार डेटा मी अभ्यासाकरिता वापरतो.
अधिक माहिती पुढील भागात ….
नितीन पोताडे, मुंबई
9869239959

Share This Post

Post Comment