*चार्ट कसा पहावा – भाग दोन

*चार्ट कसा पहावा – भाग दोन
*चार्ट कसा पहावा – भाग दोन *
वेगवेगळ्या time frame चे चार्ट उपलब्ध असतात. इंट्राडे ट्रेड करणाऱ्यांनी 5 मिनिटांच्या चार्ट चा अभ्यास करावा तर शॉर्ट टर्म म्हणजे एका दिवसापेक्षा अधिक पण ३ महिन्यापर्यंत वेळेसाठी ट्रेड करणाऱ्यांनी 30 मिनिटांच्या / 60 मिनिटांच्या  चार्ट चा अभ्यास करावा तर त्याआधिक वेळेसाठी ट्रेड करणाऱ्यांनी दिवसाच्या (daily) चार्ट चा अभ्यास करावा.
ट्रेंड कन्फर्मेशन साठी 2 वेगवेगळ्या वेळेच्या चार्ट पाहावे. दोन चार्ट पाहावे त्याचे कारण इंट्राडे करणाऱ्यांनी शॉर्ट टर्म साठी ट्रेड करणारे आपल्या बरोबर आहेत ना हे पाहावे. तसेच शॉर्ट टर्म ट्रेड करणाऱ्यांनी लॉन्ग टर्म साठी ट्रेड करणारे काय करत आहेत हे पाहावे. हे सर्व का करावे तर ट्रेड ऍक्टिव्ह झाल्यावर मनात निगेटिव्ह विचार येतात कि माझे स्टॉक सिलेक्शन बरोबर झाले असेल ना ? ट्रेंड योग्य आहे ना ? एन्ट्री प्राइस चुकली नसेल ना ? या प्रश्नावर नंतर विचार करत बसण्यापेक्षा त्याबद्दल आधीच विचारून निर्णय घ्यावा.
*ट्रेंड ओळखणे* हे चार्ट रिडींगचे सर्वात महत्वाचे काम आहे. त्यासाठी विविध इंडिकेटर उपलब्ध आहे. इंडिकेटर बद्दल अधिक माहिती आपण गूगल वर आणि यु ट्यूब वर शोधू शकता.  ट्रेंड साठी मी डाऊ थेअरी (dow theory )चा वापर करतो. डाऊ थेअरी बद्दल एक लेख लिहणार आहे.  अपट्रेन्ड म्हणजे खरेदी साठी योग्य स्टॉक शोधण्यासाठी कोणते स्टॉक नवीन नवीन high बनवत आहे ते शोधतो तर डाऊन ट्रेन्ड म्हणजे विक्रीसाठी योग्य स्टॉक शोधण्यासाठी कोणते स्टॉक नवीन नवीन low बनवत आहे ते शोधतो.
चार्ट पाहण्यासाठी   https://in.tradingview.com/ वापरतो. त्यावर login account बनवून ZIGZAG (2/5) इंडिकेटर चा वापर करतो.
खरेदी (BUY) करताना पूर्वीच्या high जवळ सध्याची म्हणजे CMP (Current Market Price ) असेल तर पूर्वीच्या high  च्या वरती खरेदी करण्यास ऑर्डर ठेवतो. उदाहरणार्थ पूर्वीचा high 175.65 आहे आणि cmp जर 175.50 आहे तर 175.70 च्या वर खरेदी करण्यासाठी buy ऑर्डर ठेवतो. त्यासाठी स्टॉप लिमिट (लॉस )ऑर्डर चा वापर करावा लागतो.
विक्री (SELL) करताना पूर्वीच्या low  जवळ सध्याची म्हणजे cmp (Current Market Price ) असेल तर पूर्वीच्या low च्या खाली विक्री करण्यास ऑर्डर ठेवतो. उदाहरणार्थ पूर्वीचा low 144.35 आहे आणि cmp जर 144.65 आहे तर 144.30 च्या खाली विक्रीसाठी sell ऑर्डर ठेवतो. त्यासाठी स्टॉप लिमिट (लॉस )ऑर्डर चा वापर करावा लागतो.   स्टॉप लिमिट (लॉस ) ऑर्डर बद्दल अधिक माहिती आपल्या ब्रोकर कडून घ्यावी.
अधिक माहिती पुढील भागात ….
नितीन पोताडे, मुंबई
9869239959

Share This Post

Post Comment