टॉस

 

सोप्या भाषेत शेअर बाजार (भाग -१५ ) – मितेश ताके

शेअर बाजारात ट्रेडिंग करताना योग्य रिस्क रिवार्ड रेशो ठेवला आणि स्टॉपलॉसची शिस्त अगदी कडकपणे पाळली तर कुठल्याही मार्केट मध्ये फायदाच होतो हे शिकवण्यासाठी मी माझी मुले— मुलगा कल्पक वय १४ वर्षे आणि कन्या सृजन वय १२ वर्षे यांच्याबरोबर एक खेळ खेळलो.

एकाने कागदावर एका खाली एक असे १० वेळेस वाटेल तसे छापा किंवा काटा लिहायचे आणि समोर गुण (नफा /तोटा) लिहिण्यासाठी जागा सोडायची. दुसऱ्याने एक नाणे टॉस करायचे जर छापा म्हटले /लिहिले असेल आणि छापाच पडला तर ५ % नफा होणार तो जमा करायचा, तो गुणांच्या जागी +५ लिहायचा जर म्हटल्याच्या उलट काटा पडला तर २% तोटा होणार, गुणांच्या जागी -२ लिहायचे.
असे १० वेळेस करायचे मग दुसऱ्याचा राउंड , मग तिसऱ्याचा राउंड.
असे आम्ही एकूण १०० वेळेस टॉस केले आणि मग शेवटी सगळ्यांची बेरीज केली.
रिझल्ट खूप इंटरेस्टिंग निघाला

पाहिले १० टॉस — ७ वेळेस बॅरोबर ( ३५ % नफा) व ३ वेळेस चूक (तोटा ६%) = एकूण नफा २९%
दुसरे १० टॉस — ४ वेळेस बरोबर ( २०% नफा) व ६ वेळेस चूक (तोटा १२%) = एकूण नफा ८ %
तिसरे १० टॉस — ६ वेळेस बॅरोबर (३० % नफा) व ४ वेळेस चूक (तोटा ८ %) = एकूण नफा २२ %
चौथे १० टॉस — ७ वेळेस बॅरोबर ( ३५ % नफा) व ३ वेळेस चूक (तोटा ६%) = एकूण नफा २९%
पाचवे १० टॉस — ४ वेळेस बरोबर ( २०% नफा) व ६ वेळेस चूक (तोटा १२%) = एकूण नफा ८ %
सहावे १० टॉस — ५ वेळेस बॅरोबर ( २५ % नफा) व ५ वेळेस चूक (तोटा १० %) = एकूण नफा १५ %
सातवे १० टॉस — ६ वेळेस बॅरोबर (३० % नफा) व ४ वेळेस चूक (तोटा ८ %) = एकूण नफा २२ %
आठवे १० टॉस — ४ वेळेस बरोबर ( २०% नफा) व ६ वेळेस चूक (तोटा १२%) = एकूण नफा ८ %
नववे १० टॉस — ५ वेळेस बॅरोबर ( २५ % नफा) व ५ वेळेस चूक (तोटा १० %) = एकूण नफा १५ %
दहावे १० टॉस — ५ वेळेस बॅरोबर ( २५ % नफा) व ५ वेळेस चूक (तोटा १० %) = एकूण नफा १५ %

१०० टॉस मध्ये ५३ वेळेस रिझल्ट आमच्या बाजूने तर ४७ वेळेस विरूद्ध लागला आणि यात एकूण नफा झाला १७१ %

यात २:५ हा रिस्क रिवार्ड रेशो आहे. म्हणजेच टार्गेट आहे ५ % आणि स्टॉपलॉस आहे २%.

थोडा अजून हिशोब केला तर लक्षात येईल की फक्त ३० % वेळा नफा झाला आणि ७० % वेळेस तोटा झाला तरी जर २:५ हा रिस्क रिवार्ड रेशो असेल तर आपले मूळ भांडवल सुरक्षित राहील.

यात १ टॉस म्हणजे १ ट्रेड आहे. समजा आपण महिन्याला १० ट्रेड घेतले तर वर १० महिन्याचे रेकॉर्ड आहे. यातून लक्षात आले असेल की कधी चांगला नफा मिळतो तर कधी कमी, पण १० महिन्याची सरासरी काढली तर १७.१०% प्रति महिना नफा दिसतो.

असाच खेळ मांडून पहा आणि पहा बरे रिझल्ट काय लागतो ते!
आणि मला पण सांगा बरं का ! !

—————————-

Share This Post

Post Comment