ट्रेडिंग सायकॉंलॉजी

 

सोप्या भाषेत शेअर बाजार (भाग -१७ ) – मितेश ताके

शेअर बाजारात यश मिळवायचे असेल तर तज्ञ मंडळी त्याचा फॉर्मुला पुढील प्रमाणे सांगतात –

१०% सिस्टीम / मेथड / टेक्निक / ट्रेडिंग प्लॅन / एन्ट्री – एक्झिट चे नियम
२०% मनी मॅनेजमेंट / रिस्क मॅनेजमेंट
७०% ट्रेडिंग सायकॉंलॉजी

सामान्य ट्रेडर फक्त पहिल्या १० % चाच अभ्यास करतात. थोडे फार नंतरच्या २० % चा अभ्यास करतात. मात्र अत्यल्प मंडळीच ट्रेडिंग सायकॉंलॉजीचा खराखुरा अभ्यास करतात, आणि तेच यशस्वी होण्याची शक्यता असते. (कारण नुसते समजून उपयोगाचे नसते तर ते अमलात पण आणावे लागते म्हणून शक्यता !)

ट्रेडिंगमध्ये नवीन असणाऱ्या मित्रांना कदाचित धक्का बसेल की ट्रेडिंगमध्ये मानसशास्त्राचे काय काम? मला देखील सुरवातीला ही गोष्ट पचली नव्हती. पण आता खूप अभ्यास आणि अनुभवाने लक्षात आले आहे की ट्रेडिंग सायकॉंलॉजीच ७० ते ९० % महत्वाची आहे.

या विषयाची एक वेगळी शाखाच मानसशास्त्रामध्ये आहे तिला “बिहेविअरल फिनान्स” म्हणतात. शेअर बाजार म्हणजे मास सायकॉंलॉजीचा अविष्कार आहे. हजारो लोकांच्या भीती आणि लोभ (fear & greed) या व इतर भावनांचा हा खेळ आहे. या विषयावर जगभर खूप खूप संशोधन झालेले आहे आणि रोज त्यात नवीन नवीन भर पडत आहे.

त्यामुळे जोपर्यंत तुम्ही ट्रेडिंग सायकॉंलॉजी नीट समजून घेत नाही तोपर्यंत यश मिळणारच नाही. त्यासाठी खूप पुस्तके / लेख / ब्लॉग्ज / व्हिडीओ इ. इ. चा अभ्यास करावा लागेल. या विषयावर मराठी मध्ये काहीही उपलब्ध नाही. सर्व इंग्लिश मध्येच आहे. त्यामुळे काही लोकांना त्रास होईल पण त्याशिवाय पर्याय नाही .

तेव्हा मित्रानो अर्धवट तयारीने शेअर मार्केट मध्ये उतरू नका, नाही तर निकाल ठरलेलाच आहे ….

—————————-

Share This Post

Post Comment