निफ्टीचा पी इ रेशो

निफ्टीचा पी इ रेशो

 

सोप्या भाषेत शेअर बाजार (भाग -२६ ) – मितेश ताके

निफ्टीचा पी इ रेशो वापरून शेअरबाजारात घसघशीत नफा कसा कमावता येतो, हे आपण मागील लेखात थोडक्यात समजून घेतले होते ते असे –

निफ्टीचा पी/ई रेशो १४-१५ च्या खाली आला की ब्लू चिप शेअर्स/ इंडेक्स म्युच्यूअल फंड / इक्वीटी म्युच्यूअल फंड यात टप्याटप्याने पैसे गुंतवावेत आणि ८-१० वर्षांनी पी/ई रेशो २४-२५ च्या वर गेला की टप्याटप्याने विक्री करावी. भरभरून नफा मिळेल.

हा फॉर्म्युला येथे तपशिलात समजावून घेऊ.

८ जानेवारी २००८ ला निफ्टीचा पी इ रेशो २८.२९ इतका उच्च झाला होता. त्यानंतर मार्केट कोसळले आणि २७ ऑक्टोबर २००८ ला निफ्टीचा पी इ रेशो १०.६८ इतका कमी झाला होता. १० ऑक्टोबर २००८ ते ३१ मार्च २००९ या सहा महिन्याच्या काळात मार्केट बॉटमला लोळत होते, आणि निफ्टीचा पी इ रेशो १५ च्या खाली होता . सध्या जून २०१७ मध्ये निफ्टीचा पी इ रेशो २४ ते २५ च्या दरम्यान आहे.

म्हणजे आपल्या फॉर्म्युल्यानुसार जर आपण १० ऑक्टोबर २००८ ते ३१ मार्च २००९ च्या दरम्यान ब्लू चिप शेअर्स/ इंडेक्स म्युच्यूअल फंड / इक्वीटी म्युच्यूअल फंड यात गुंतवणूक केली असती तर आता त्याचे काय झाले असते हे पाहू –
समाजा आपण खालीलप्रमाणे सहा महिन्यातील सरासरी भावाने १० शेअर्स खरेदी केली असते तर साडे आठ वर्षात काय झाले असते –

10 shares

वरील १० शेअर्सची सरासरी वाढ ५.६२ पट झाली आहे.

म्हणजे या दहा शेअर्समध्ये जर आपण साडे आठ वर्षापूर्वी १० लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याची व्हॅल्यू ५० लाख ६२ हजार इतकी असती. अर्थात यातील काही शेअर्सनी वेळोवेळी डिव्हिडंड पण दिला आहे, तो मात्र हिशोबात धरलेला नाही.

ज्यांना शेअर्स निवडत बसायला वेळ नाही, त्यांना म्युच्युअल फंड हा चांगला पर्याय आहे. त्यांची साडे आठ वर्षातील कामगिरी खालील प्रमाणे

१) फंडाचा प्रकार = इंडेक्स फंड – लार्जकॅप
फंडाचे नाव = युटीआय निफ्टी इंडेक्स फंड
त्या सहा महिन्यातील उच्चतम भाव (High) = २२.२२ रु.
त्या सहा महिन्यातील सर्वात कमी भाव (Low) = १६.२३ रु.
हाय-लो चा सरासरी भाव = १९.२२ रु.
सध्याचा भाव = ६१.६८ रु.
साडे आठ वर्षात झालेली वाढ = ३.२० पट

या फंडात जर आपण १० लाख गुंतवले असते, तर साडे आठ वर्षात ३० लाख २० हजार झाले असते.

२) फंडाचा प्रकार = इंडेक्स फंड – मिडकॅप
फंडाचे नाव = रिलायन्स इ टी एफ ज्युनिअर बीइइएस फंड
त्या सहा महिन्यातील उच्चतम भाव (High) = ५२.३८ रु.
त्या सहा महिन्यातील सर्वात कमी भाव (Low) = ३६.८५ रु.
हाय-लो चा सरासरी भाव = ४४.६१ रु.
सध्याचा भाव = २७० रु.
साडे आठ वर्षात झालेली वाढ = ६.०५ पट

या फंडात जर आपण १० लाख गुंतवले असते, तर साडे आठ वर्षात ६० लाख ५ हजार झाले असते.

३) फंडाचा प्रकार = लार्जकॅप फंड
फंडाचे नाव = बिर्ला सन लाईफ फ्रंट लाईन इक्विटी फंड
त्या सहा महिन्यातील उच्चतम भाव (High) = ४५.९७ रु.
त्या सहा महिन्यातील सर्वात कमी भाव (Low) = ३६.४४ रु.
हाय-लो चा सरासरी भाव = ४१.२० रु.
सध्याचा भाव = २७० रु.
साडे आठ वर्षात झालेली वाढ = ६.५५ पट

या फंडात जर आपण १० लाख गुंतवले असते, तर साडे आठ वर्षात ६० लाख ५५ हजार झाले असते.

४) फंडाचा प्रकार = मिडकॅप फंड
फंडाचे नाव = सुंदरम सिलेक्ट मिडकॅप म्युच्युअल फंड
त्या सहा महिन्यातील उच्चतम भाव (High) = ६७.६९ रु.
त्या सहा महिन्यातील सर्वात कमी भाव (Low) = ४८.६९ रु.
हाय-लो चा सरासरी भाव = ५८.१९ रु.
सध्याचा भाव = ४८७.५६ रु.
साडे आठ वर्षात झालेली वाढ = ८.३८ पट

या फंडात जर आपण १० लाख गुंतवले असते, तर साडे आठ वर्षात ८० लाख ३८ हजार झाले असते.

५) फंडाचा प्रकार = स्मॉलकॅप फंड
फंडाचे नाव = डीएसपी ब्लॅकरॉक मायक्रो कॅप फंड
त्या सहा महिन्यातील उच्चतम भाव (High) = ६.६८ रु.
त्या सहा महिन्यातील सर्वात कमी भाव (Low) = ४.२० रु.
हाय-लो चा सरासरी भाव = ५.४४ रु.
सध्याचा भाव = ६२.३८ रु.
साडे आठ वर्षात झालेली वाढ = ११.४६ पट

या फंडात जर आपण १० लाख गुंतवले असते, तर साडे आठ वर्षात १ कोटी १० लाख ४६ हजार झाले असते.

आता हे पुन्हा सगळे अगदी असेच घडेल असे अजिबात नाही. फक्त यातून एव्हढेच शिकायचे की इंडेक्सचा पी इ रेशो वापरून आपण अभ्यास करून पैसे गुंतवले तर ८ ते १० वर्षात घसघशीत परतावा मिळू शकतो.

अभ्यासासाठी शुभेच्छा !

—————————-
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा –
https://www.facebook.com/StockMarketinSimpleMarathi
—————————-
illustration courtesy : Designed by Freepik
http://www.freepik.com/free-vector/cheerful-businessman-throwing-money-up_1109553.htm

—————————-
Tag – #Share market #stock Market #investment #trading #sensex #nifty #wealth #intraday #multibagger #marathi #saving #daytrading #शेअर #बाजार ‪#‎गुंतवणूक‬ #बचत #सेन्सेक्स #ट्रेडिंग #स्टॉक #करन्सी #मराठी #निफ्टी #डेट्रेडिंग #गुंतवणूकदार
Advertisements

Report this ad

Report this ad
Posted on जून 21, 2017
Leave a comment

Share This Post

Post Comment