पिओए (पॉवर ऑफ एटर्नी)

शेअर मार्केट मध्ये विविध फायदे गुंतवणूकदारांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पूर्वी गुंतवणूकदारांना शेअर विकल्यास डिलीव्हरी स्लीप भरून द्यावी लागत असे. मात्र आता पिओए (पॉवर ऑफ एटर्नी) दिल्यास ही स्लीप भरून द्यायची गरज पडत नाही. पी.ओ.ए. देण्याने काहीही नुकसान नाही. त्यामुळे केवळ तुमच्या ब्रोकरला तुमच्या खात्यातील शेअर्स विकल्यावर ते त्याच्या खात्यात वळते करून घ्यायची मुभा देत असतात. पी.ओ.ए. दिल्यास तुम्हाला सी.डी.एस.एल. तर्फे (स्मार्ट) स्मार्ट एस.एम.एस. अलर्ट या सुविधेचा फायदा मिळतो. तुमच्या डीमेट खात्यातून जर शेअर्स विकले गेले तर तुम्हाला त्वरित सी.डी.एस.एल कडून एस.एमेस येईल व तुमच्या लक्षात येईल की तुमच्या खात्यात काही गैरव्यवहार झाला आहे की नाही. तसे असल्यास तुम्ही लगेचच तक्रार करू शकता.
सेबीच्या नव्या नियमानुसार गुंतवणूकदारांना नॉमिनेशन करणे अत्यावश्यक आहे. ते विनामुल्य असते. एका डीमेट खात्यावर एकच नॉमिनेशन करता येते. गुंतवणूकदार आपले नॉमिनेशन बदलूही शकतात.
जर तिघांचे जॉईन्ट खाते असेल आणि दोघांचे अपघाती निधन झाले तर उरलेल्या व्यक्तीच्या नावे वेगळे डीमेट खाते उघडावे लागते व ट्रान्समिशन फॉर्म व डेथ सर्टिफिकेटची कॉपी देऊन जॉईन्ट खात्यातील शिल्लक असलेल्या व्यक्तीच्या नवीन खात्यात सर्व शेअर्स ट्रान्सफर करतात. येथे नॉमिनी असला तरीही ते शेअर्स क्लेम करू शकत नाही.
जर तिन्ही व्यक्तींचे निधन झाले तर नोमिनीचे डीमेट खाते उघडून त्यात शेअर्स ट्रान्सफर केले जातात. त्यानंतर नोमिनीने ते शेअर्स मूळ गुंतवणूकदारांच्या ख-या वारसांना वाटून द्यायचे असतात. कारण नॉमिनी हा त्या शेअर्सचा मालक नसतो.
सी.डी.एस.एल तर्फे गुंतवणूकदारांना इ.ए.एस.आई. ( इलेक्ट्रोनिक एपेस्स टू सिक्युरिटीज ) ही सुविधा विनामूल्य मिळते. या सुविधेचां फायदा म्हणजे तुम्ही तुमचे डीमेट खात्याचे स्टेटमेंट इंटरनेटवर कितीही वेळा बघू शकता व त्याची प्रिंटही काढू शकता. यासाठी तुमचे डीमेट खाते उघडतानाच अकाऊंट ओपनिंग फॉर्ममध्ये तुमचा इ-मेल अड्रेस दिलात तरी चालते किंवा नंतरही या सुविधेसाठी एक अर्ज डीपी कडे करून ती सुविधा मिळवू शकता.
अनेकदा तुमच्या खात्याचे स्टेटमेंट एका महिन्याने मिळते. महिन्याभरात व्यवहार झाला नाही तर तीन महिन्याने तुमचा डीपी स्टेटमेंट पाठवतो. मात्र इ.ए.एस.आय. सुविधेमुळे तुमच्या खात्यातील शेअर्सवर तुम्ही रोज नजर ठेवू शकता. खात्यातील शेअरची मार्केट व्हैल्यू काय आहे ते सुद्धा पाहू शकतात. अशा प्रकारे तुमच्या खात्यातील प्रिंट आउट दर १५ दिवसांनी काढायची सवय लावली तर स्वत:ला शेअर्सचे मूल्य अवलोकन करणे शक्य होते.
( अजित मन्जुरे वरिष्ठ अधिकारी-सी.डी.एस.एल./ मनीप्लस (मा) मधून साभार)

Share This Post

Post Comment