पेपर ट्रेडिंग

पेपर ट्रेडिंग

सोप्या भाषेत शेअर बाजार (भाग -७) – मितेश ताके

शेअर बाजार काय कुठे पळून जात नाही, पैसे लावायची घाई करू नका. तुम्हाला असे वाटत असेल की माझा पुरेसा अभ्यास झाला आहे, मला आता गुंतवणूक किंवा ट्रेडिंग समजले आहे तर आधी पैसे न लावता पेपर ट्रेडिंग करा. जर पेपर ट्रेडिंग मध्ये नफा दिसला तर आणि तरच प्रत्यक्ष गुंतवणूक करा. सुरवातीला खूप कमी रक्कम गुंतवा डुबली तरी वाईट वाटणार नाही इतकी, कारण पेपर ट्रेडिंग मध्ये आणि खरोखर पैसे लावण्यात पण खूप फरक आहे. शेवटी आत्मविश्वास वाढल्यावर मगच मोठ्या रकमेचा विचार करा. शेअर मार्केट सर्वांसाठी नाही कारण हा सायकॉलॉजीचा खेळ आहे. जमत नसेल तर सोडून द्या, उगीच अट्टाहास नको, नाहीतर नुकसानीशिवाय काहीही हाती लागणार नाही.

आता पेपर ट्रेडिंग काय आहे ते समजून घ्या –
लहानपणी आपण व्यापार नावाचा खेळ खेळायचो. त्यात लुटूपूटूच्या नोटा असायच्या पण त्यातून व्यवहार शिकायचो. आगदी तसच लुटूपूटूची शेअर खरेदी विक्री करायची. एक डायरी घ्यायची त्यात नोंद करायची XYZ हा शेअर अमुक किमतीला घेतला. मग रोज त्या शेअरची किंमत कमी झाली की वाढली ते तपासायचे, नफा तोटा तपासायचा. असे करत जायचे आणि आपला अभ्यास तपासायचा. याला म्हणतात पेपर ट्रेडिंग !

असे ट्रेडिंग करण्याची सोय काही वेबसाइटवर मोफत उपलब्ध आहे. याला व्हर्च्युअल ट्रेडिंग किंवा ऑनलाईन ट्रेडिंग गेम म्हणतात. येथे शेअर बाजारातील चालू भाव दिसतात आणि अगदी इंट्रा डे ट्रेडिंगचा पण सराव करता येतो. अशा भारतातल्या प्रसिद्ध वेबसाइट पुढील प्रमाणे

http://www.nseindia.com/NP/nse_paathshaala.htm

http://moneybhai.moneycontrol.com/

सावधान – मी हा व इतर काही सल्ले मानले नव्हते किंवा मला माहित नव्हते पण त्याची शिक्षा म्हणून काही लाख रुपये गमावले. मी केलेली चूक तुम्ही करू नये असे वाटल्याने सांगितले. शेवटी निर्णय तुमचा आहे .

—————————-
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा –
https://www.facebook.com/StockMarketinSimpleMarathi
—————————-

Posted on एप्रिल 7, 2016
Leave a comment

Share This Post

Post Comment