पोर्टफोलिओ

 

सोप्या भाषेत शेअर बाजार (भाग -२० ) – मितेश ताके

मित्रांनो मी शेअर मार्केट मध्ये हे शिकलो कि जर आपल्या पोर्टफोलिओमध्ये १०-२० चांगले निवडक शेअर्स असतील तर . दीर्घकाळासाठी (५ ते १० वर्ष ) त्यापैकी ३०% मध्ये तोटा होतो, ३०% मध्ये खूप तोटाही होत नाही आणि खूप नफाही होत नाही, मात्र ४०% मध्ये भरपूर नफा होतो, जो झालेला ३०% चा तोटा भरून काढतो आणि बँकपेक्षा जास्तच नफा/रिटर्न्स देतो. मात्र निवड खरोखर चांगली हवी.

या दिवाळीत मी काही शेअर्स निवडले आहेत. हे निवडताना खालील निकष लावले आहेत-
१. नफ्यात दरवर्षी सातत्याने वाढ होत आहे. म्हणजे कंपनी दरवर्षी प्रगती करत आहे. अशीच प्रगती राहिली तर आपला फायदाच फायदा होईल.
२. नफ्याचे प्रमाण ( नेट प्रॉफीट मार्जिन % ) मध्ये पण दरवर्षी वाढ होत आहे. म्हणजे खर्चावर नियंत्रण ठेऊन नफा देणाऱ्याच गोष्टींवर लक्ष केंद्रिंत करत आहे.
३. मागील वर्षाची तिमाही ते या वर्षाची तिमाही यात पण नफ्यात वाढ आहे. म्हणजे या वर्षी पण नफा वाढतॊच आहे.
४. कंपनीवर कर्ज फारच कमी आहे. त्यामुळे कमाविलेला नफा व्याजापोटी खर्च होणार नाही. ते पैसे कंपनी आपल्या वाढीसाठी किंवा शेअर होल्डर्सना डिव्हिडंड इ. मार्गाने फायदा देण्यासाठी उपयोगी पडेल.
५. राखीव निधी ( रिझर्व्ह आणि सरप्लस) मध्ये वाढ म्हणजे कंपनी पैसे पाणी बाळगून आहे आणि त्यात वाढच होत आहे. ते पैसे कंपनी आपल्या वाढीसाठी किंवा शेअर होल्डर्सना डिव्हिडंड इ. मार्गाने फायदा देण्यासाठी उपयोगी पडेल.
६. कंपनी मध्ये मुख्य मालकांचा (प्रवर्तक) शेअर्सचा हिस्सा भरपूर आहे याचे दोन अर्थ होतात. एक तर मालकांचे कंपनीवर व कारभारावर मजबूत पकड राहते. दुसरा त्याचा स्वतःच्या व्यवसायावर, कर्तबगारीवर विश्वास आहे.
७. मोठ्या गुंतवणूकदार संस्थांनी (इन्टिट्यूशनल इन्व्हेस्टर ) पैसे गुंतवलेले आहेत. अशी गुंतवणूक करताना या संस्था भरपूर बारीक अभ्यास करतात. जर सर्व निकषांवर योग्य असेल तरच गुंतवणूक करतात. त्यांच्या अभ्यासाचा आपल्याला पण फायदा !
८. सध्याचा शेअर्सचा भाव या वर्षातील सर्वात जास्त भावापेक्षा कमी आहे.
९. या कंपनीचा पी/इ रेशो त्याच प्रकारच्या कंपन्यांच्या सरासरी पी/इ रेशो पेक्षा कमी आहे. म्हणजेच इतर कंपनीपेक्षा या कंपनीचा शेअर सरासरी स्वस्त आहे .
१०. कंपनीचे इतर काही वैशिष्ट्ये उदा. मजबूत ब्रँड, जगभर जाळे, इ.

अशा मी २० कंपन्या निवडल्या आहेत त्यांची यादी खाली देत आहे याचा अर्थ लगेच आपण खरेदी करावा असा नाही. एक तर पहिले आपण स्वतः अभ्यास करावा जर आपल्याला योग्य वाटले तरच खरेदीचा निर्णय घ्यावा. जर शेअरचा भाव सध्या रेसिस्टन्सजवळ असेल तर खाली सपोर्टपर्यंत येईस्तोवर थांबावे (हे कळले नसेल तर एखाद्या जाणकारांकडून सपोर्ट आणि रेसिस्टंस समजून घ्यावे ) आणि मगच खरेदी करावे. शक्यतो एकदम खरेदी न करता टप्याटप्याने जेव्हा जेव्हा भाव कोसळतील तेव्हा तेव्हा खरेदी करावे म्हणजे सरासरी भावाने खरेदी होईल.

निवडलेल्या कंपन्या पुढील प्रमाने –
१. Apollo Tyres (Automotive)
२. Avanti Feeds ( Aquaculture )
३. Chaman Lal Seti (Food & Beverage)
४. Force Motors (Automotive )
५. Hind Composites (Automotive)
६. ITC (Diversified)
७ Igarashi Motors (Engineering)
८. KSB Pumps (Engineering)
९. Kajaria Ceramic (Cement/Construction)
१०. La Opala RG (Glass Manufacturing)
११. Marico (Cons Non-Durable)
१२. Maruti Suzuki (Automotive)
१३. Pidilite Ind (Chemicals)
१४. S H Kelkar (Fragrance Manufacturer )
१५. Satin Credit (Banking/Finance-Micro credit )
१६. Sharda Crop (Chemicals)
१७. Techno Electric (Engineering)
१८. Timken (Engineering)
१९. Ujjivan Financi (Banking/Finance-Micro credit)
२०. Wonderla (Entertainment Theme Park )

यापैकी काही कंपन्या वरील सर्व निकष पूर्ण करत नाहीत तरी त्या निवडल्या आहेत कारण त्या आश्वासक वाटत आहेत.

अभ्यासासाठी शुभेच्छा !

—————————-
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा –
https://www.facebook.com/StockMarketinSimpleMarathi
—————————-

Posted on नोव्हेंबर 8, 2016
Leave a comment

Share This Post

Post Comment