बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE).

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE).

सोप्या भाषेत शेअर बाजार (भाग -६) – मितेश ताके

भाजी खरेदी करणारा आणि विकणारा या दोघांना एकत्र येण्याचे ठिकाण म्हणजे भाजी मंडई. स्टॉक एक्सचेंज पण अशीच एक शेअर्सची मंडई असते. शेअर खरेदी विक्री करण्याचे कायदेशीर ठिकाण – एक प्लॅटफॉर्म. भारतात खूप मंड्या आहेत पण चालतात फक्त दोनच- बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE). यातील बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये साधारणपणे २०% व्यवहार होतात तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये ८० %. मी फक्त नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्येच ट्रेडिंग करतो.

पूर्वी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची मोनोपॉली होती पण त्यांच्या कारभारात गडबड होती, म्हणून मग काही सरकारी संस्था आणि बँकांनी मिळून नॅशनल स्टॉक एक्सचेंजची स्थापना केली. त्यामुळे दोन्हीत स्पर्धा वाढली, नवनवीन सुधारणा झाल्या, मुख्य म्हणजे पारदर्शकता वाढली, खूप प्रगती झाली. त्यामुळेच आपण आरामशीरपणे घरी बसून लॅपटॉपवर/ मोबाईलवर ट्रेडिंग करू शकतो.

या एक्सचेंजमध्ये शेअर्सव्यतिरिक्त बॉन्ड, करन्सी डेरीवेटीव सारख्या इतरही आर्थिक गोष्टी/ प्रोडक्ट्स/ वस्तू विकल्या जातात. नवीन माणसाने आताच त्या सगळ्या गोष्टीच्या मागे लागू नये. आधी फक्त शेअर संबंधीच आभ्यास वाढवावा.

—————————-

Share This Post

Post Comment