ब्रोकरेज

सोप्या भाषेत शेअर बाजार (भाग -१९ ) – मितेश ताके

माझे पेपर ट्रेडिंगचे प्रयोग संपले मग मी खूप छोट्या प्रमाणात प्रत्यक्ष ट्रेडिंग केले. ते पण जमायला लागल्यावर मात्र मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग चालू केले. पहिला महिना ना नफा ना तोटा असा गेला. मी खुश होतो चला पैसे गमावले तर नाही ना!

पण महिनाभरात एकूण ब्रोकरेज किती दिले याची बेरीज केली तेव्हा मात्र धक्का बसला. मी ब्रोकरेज व टॅक्स मिळून तब्ब्ल १५००० रु दिले होते. म्हणजे जर ब्रोकरेज कमी असते तर मला नफा झाला आसता.

मी एका फुल सर्विस ब्रोकर कडे खाते उघडलेले होते. फुल सर्विस ब्रोकर म्हणजे त्याचे तुमच्या गावात ऑफिस असते. ४-१० कॉम्पुटर असतात. तुम्ही तेथे जाऊन त्याच्या ऑपरेटरच्या मदतीने ट्रेडिंग करू शकता किंवा फोनवरून पण खरेदी विक्री करण्याचे सांगू शकता. जर तुमच्याकडे घरी कॉम्पुटर असेल तर घरून पण स्वतःच ट्रेडिंग करू शकता काही अडचण आली तर त्यांचा स्टाफ मदतीला तयार असतो. ट्रेडिंग साठी त्यांचे सॉफ्टवेअर पण असते. त्या ब्रोकरेज हाऊसचे रिसर्च रिपोर्ट तुम्ही वापरू शकता. त्यानुसार शेअर खरेदी विक्री करू शकता. जर डे- ट्रेडिंग करणार असाल तर मार्जिन अगदी २० पट पण देतात. म्हणजे जर तुम्ही १ लाख भांडवल वापरत असाल तर जास्तीत जास्त २० लाख रु चे शेअर एका वेळी खरेदी किंवा विक्री करू शकता. अर्थात त्यात त्यांचा पण फायदा असतो त्यांना ब्रोकरेज २० लाखावर मिळते. पण ज्या ट्रेडरकडे भांडवल कमी आहे त्यांना कमी पैश्यात जास्त उलाढाल करता येते. जास्त नफा/ तोटा होतो.

मी जरी फुल सर्विस ब्रोकर निवडला होता तरी मी स्वतःच सर्व रिसर्च करत होतो आणि त्या स्टाफची कुठलीही मदत न घेता माझ्या घरूनच ऑनलाईन ट्रेडिंग करत होतो. मात्र २० पट मार्जिन वापरात होतो.

नेमके त्याचवेळी माझ्या वाचनात डिस्काउंट ब्रोकर विषयी माहिती आली. यांची कुठल्याही गावात ब्रँच नसते. फक्त हेड ऑफिस असते. आपण त्यांच्याकडे अकाउंट उघडून घरूनच कॉम्पुटर/मोबाईल द्वारे ट्रेडिंग करायचे असते. ट्रेडिंग साठी यांचे पण सॉफ्टवेअर असते. पण ब्रोकरेज अत्यंत कमी असते. काही अडचण आली तर त्यांचे कॉल सेंटर ला फोन करून मदत मिळवू शकता. मार्जिन मात्र मिळत नाही.

मग मी थोडा अभ्यास करून https://sasonline.in/

या ब्रोकर कडे खाते उघडले. मार्जिन मिळणार नाही तर त्याची कमतरता भरून काढण्यासाठी शेअर्स ऐवजी डेरिव्हेटीव्ह मध्ये ट्रेडिंग करू असे ठरवले. आजपर्यंत काहीच अडचण आली नाही. आता हाच ब्रोकर चांगला असा माझा दावा नाही !

पूर्वी एक ट्रेड पूर्ण करण्यासाठी जवळ जवळ १.५ % खर्च यायचा. जर डे ट्रेडिंग असेल तर थोडा कमी असायचा पण आता मी महिन्याला फक्त रु. ९९९ (टॅक्स सह साधारणपणे रु. ११००) भरतो आणि किती पण ट्रेडिंग करतो. ज्यांना रोज ट्रेडिंग करायचे नाही त्यांना, ते दुसरा पण पर्याय देतात ९ रु प्रति खरेदी/ विक्री.

तुम्ही जर डिस्काउंट ब्रोकर इंडिया असे इंटरनेटवर शोधले तर १०-१२ ब्रोकर सापडतील. तुलना करून कोण किती स्वस्त आणि चांगले आहे ते ठरावा आणि खाते उघडा…
—————————-

Share This Post

Post Comment