“मार्केट अनप्रेडिक्टेबल आहे” आणि “मार्केट नेहमी पेशन्स टेस्ट करते”

 

सोप्या भाषेत शेअर बाजार (भाग -३४ ) – मितेश ताके 

“मार्केट अनप्रेडिक्टेबल आहे” आणि “मार्केट नेहमी पेशन्स टेस्ट करते” शेअर मार्केट संबंधित या दोन म्हणींचा सध्या मी अनुभव घेतो आहे.

आर्थिक आघाडीवर आपला देश अतिशय सुमार कामगिरी करत आहे. रोज बँक घोटाळे उघड होत आहेत. अशा परिस्थितीत मार्केट कोसळणे अपेक्षित आहे पण अनप्रेडिक्टेबल या म्हणी नुसार ते उलटेच वागत आहे.

मी २३ एप्रिल २०१७ ला लेख क्रमांक २३ लिहिला होता आणि त्यात भाकीत केले होते कि लवकरच मार्केट कोसळेल. खरे तर मी त्या आधीपासून मार्केट कोसळण्याची वाट पाहतो आहे. पण म्हणतात ना “मार्केट नेहमी पेशन्स टेस्ट करते”

सध्या मी Franklin India Ultra Short Bond Fund Super Institutional Plan – Direct – Growth या फंडात पैसे ठेवा असा सल्ला सर्वाना देत आहे. हा डेट फंड असून अल्ट्रा शॉर्ट टर्म या प्रकारात मोडतो. याचा आजच्या तारखेला (०८/०७/१८) परतावा ( रिटर्न्स) आहे – १ वर्ष = ७.७७ %, ३ वर्षची सरासरी = ८.९४ % आणि ५ वर्षांची सरासरी ९.४० %

मग आता किती वाट पाहायची? तर जगातील सर्व श्रेष्ठ गुंतवणूकदार श्री वॉरेन बफे हे योग्य संधीची वाट पाहत कधी कधी ७/८ वर्ष पण थांबतात. मला तर आताशी एक वर्ष झाले आहे !

पण मी मार्केट कोसळण्याची वाट का पाहतो आहे?

कारण ती दीर्घ काळासाठीची गुंतवणुकीची मोठी संधी असेल !

सध्या निफ्टीचा पी इ रेशो धोक्याच्या पातळी २४ च्या वर आहे. २६-२७ च्या दरम्यान आहे. आता गुंतवणूक करणे धोक्याचे आहे. हा पी इ रेशो १३-१४ च्या खाली गेल्यावर गुंतवणूक करणे फायद्याचे असते.

त्यामुळे सध्या वाट पाहणे इतकेच माझ्या हातात आहे !

—————————-

Share This Post

Post Comment