रिस्क रिवार्ड रेशो

रिस्क रिवार्ड रेशो

सोप्या भाषेत शेअर बाजार (भाग -२) – मितेश ताके

मी मित्राला सांगितले की, “भरपूर अभ्यास आणि अनुभवामुळे माझी शेअर बाजाराविषयीची भाकिते ७०% वेळेस बरोबर निघतात.”

तर त्या मित्राने प्रश्न विचारला की, “शेअर बाजारात ७०% भाकिते बरोबर आल्यास कसा फायदा होतो ? चुकलेल्या ३०% भाकितात खूप नुकसान झाले तर ?”

फायदा कसा होतो ते समजून घेऊयात –
मी १० ट्रेड घेतले त्यापैकी ४ मध्ये नफा झाला ; ३ मध्ये तोटा झाला आणि उरलेल्या ३ व्यवहारात नफा पण झाला नाही आणि तोटा पण झाला नाही. ( कधी कधी घेतलेला ट्रेड रेंगाळतो धड नफाही होत नाही आणि तोटाही होत नाही. मात्र दुसरी चांगली संधी येते, मग ना नफा ना तोटा बाहेर पडावे लागते.)

ट्रेड घेण्यापूर्वीच किती नफा झाला असता तो बुक करायचा आणि किती तोटा स्वीकारायचा हे ठरलेले असते. उदा. – ५ % नफा झाला तर शेअर विकायचे किंवा ३% तोटा झाला तरी शेअर विकायचे. तोटा वाढू दयायचा नाही. शेअरचा भाव वाढेल, परत वरती जाईल आणि मग कमीत कमी घेतलेल्या भावात विकू आशी वाट पहायची नाही. विकायचा म्हणजे विकायाचाच! या ३% ला “स्टॉपलॉस” म्हणतात.

तोटा : नफा ( येथे ३:५) याला “रिस्क रिवार्ड रेशो” म्हणतात. आता प्रत्येक ट्रेडरचा हा रेशो कमी जास्त असतो.

तर वरील उदाहरणात समजा ४ व्यवहारात प्रत्येकी ५ % नफा झाला म्हणजे एकूण नफा २०%, ३ व्यवहारात प्रत्येकी ३ % तोटा झाला म्हणजे एकूण तोटा ९ % आणि उरलेल्या ३ व्यवहारात नफा पण झाला नाही आणि तोटा पण झाला नाही.

तर एकूण फायदा झाला २०% – ९% = ११%

हे खूप सोपे करून सांगितले आहे. प्रत्यक्ष थोडीशी गुंतागुंत वाढते.

Share This Post

Post Comment