शार्क तयार आहेतच !

सोप्या भाषेत शेअर बाजार (भाग -१४ ) – मितेश ताके

जगभर मंदीचे वातवरण असते. काही देश दिवाळखोरी जाहीर करतात की काय अशी परिस्थिती असते. डॉलरचा भाव प्रचंड वाढलेला असतो, त्यामुळे आयात खूप महाग झालेले असते. कच्च्या तेलाचे भाव अती वाढलेले किंवा अती पाडलेले असतात. जगभर दहशतवाद थैमान घालत असतो.

भारतात संसदेचे कामकाज चालू दिले जात नाही. महत्वाचे ठराव – बिल पास होत नाहीत. महागाई भडकलेली असते. धर्माच्या नावाने दंगली होत असतात. कट्टरवाद बोकाळलेला असतो. भ्रष्टाचाराचा भस्मासूर हैदोस घालत असतो. आयात निर्यात मंदावलेली असते. औदयोगीक उत्पादन दिवसेंदिवस घटत चाललेले असते. जी डी पी आणि आर्थिक तुटीचे फेक आकडे सादर होत असतात. मोठे उद्योगपती हजारो कोटींचे कर्ज बूडवून परदेशी पळून जात असतात . राष्ट्रीय बँकांच्या NPA ने धोक्याची पातळी गाठलेली असते. दुष्काळ पडलेला असतो. शेतकरी आत्महत्या करत असतात. जगभरचे शेअर बाजार पण खालच्या दिशेने जात असतात तरी फक्त भारतातील शेअरबाजारात कधी छोटी तर कधी मोठी तेजी असते असे का ?

हे समजून घ्यायचे असेल तर खालील गोष्टी समजून घ्याव्या लागतील –
जगातील ५०% संपत्ती फक्त १% लोकांच्या ताब्यात आहे. हे १% लोकच सर्व जग चालवतात. सर्व अर्थ बाजार यांच्या तालावर नाचतात. कुठे मंदी आणायची कुठे तेजी आणायची हे लोक ठरवत असतात. सतत एका बाजारातून पैसे काढून दुसऱ्या बाजारात फिरवले जात असतात. ज्या बाजारातून काढले जातात तेथे मंदी आणून शॉर्ट पोजिशन घेतात आणि मंदीतून पैसा कमावतात. तर ज्या बाजारात पैसा ओतला जातो त्यात तेजीतून पैसा कमावतात. श्रीमंत अधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिक गरीब !

असा हा खूप मोठा भयानक खेळ आहे. जे सामान्य ट्रेडर हा खेळ समजू शकतात तेच थोडे ट्रेडर नियमित पैसा कमावतात बाकी सगळे हलाल होत असतात. खेळात उतरण्यापूर्वी सर्व समजून घ्या नाहीतर शार्क तयार आहेतच !

—————————-

Share This Post

Post Comment