सोप्या भाषेत शेअर बाजार (भाग -४) – मितेश ताके
कुठल्याही क्षेत्राची आपली एक भाषा असते. त्यांचे काही विशेष शब्द असतात. मात्र आपल्या रोजच्या वापरत त्यांचे वेगळे अर्थ असतात. तसच शेअर बाजाराची पण आपली एक भाषा आहे. ती हळूहळू समजून घेणे जरुरी आहे. एका दिवसात हे सर्व समजणार नाही याची जाणीव ठेवा.
सुरवातीला स्मॉल कॅप, मिड कॅप, ब्लू चीप, डीमॅट, स्टॉपलॉस, टेक्निकल अॅनॅलीसीस, फंडामेंटल अॅनॅलीसीस, सपोर्ट, ऑपरेटर, ब्रेकआउट, डेरीवेटीव, इ.इ. जेव्हा असे शब्द ऐकायचो किंवा वाचायचे तर खूप गोंधळ उडायचा. इक्विटी, शेअर, स्टॉक आणि स्क्रिप्ट या चारही शब्दांचा अर्थ एकच आहे हे माहित नव्हते. काहीच कळायचे नाही पार वेडा होऊन जायचो. या व अशा शब्दांचा अर्थ शोधण्यासाठी खूप जीव काढायचो. या क्षेत्रातील लोकांना पिडायचो. त्याचदरम्यान एकाकडे शेअर मार्केटची डिक्शनरी पाहायला मिळाली. माझ्या गावातील दुकानात शोधली, मिळाली नाही. मग त्या डिक्शनरीवाल्याच्या हातापाया पडून काही वेळासाठी उसनी घेतली आणि तिची झेरोक्स काढून आणली. मिळल तिथून शिकण्याचा प्रयत्न करत राहिलो.
थोडक्यात शेअर बाजाराची भाषा शिका. जर काही शब्द आडत असतील तर मला विचारा, माहित असेल तर नक्की सांगेल!
——————