शेअर बाजारातील गुंतवणूकदाराचे संरक्षण आणि तक्रार निवारण

शेअर बाजारातील गुंतवणूकदाराचे संरक्षण आणि तक्रार निवारण

प्रश्न १) : गुंतवणुकीसाठीचा अर्ज व त्या सोबतच्या अर्ज भूगताना (एप्लिकेशन मनी) सह कुठे पाठवायचा?
उत्तर : सेबीच्या सूचनेप्रमाणे सार्वजनिक शेअर / कर्जरोखे वितरणासाठी अर्ज स्वीकारण्याची केंद्रे खालीलप्रमाणे कंपनीने ठेवावी लागतात.
अ) मुंबई, दिल्ली, कोलकता, चेन्नई या मेट्रोपोलिटन ठिकाणी.
आ) संबंधित कंपनीचे रजिस्टर्ड ऑफिस ज्या प्रदेशात आहे, तेथील शेअर बाजाराच्या ठिकाणी.
इ) संबंधित प्रदेशातील शेअर बाजाराच्या इतर गावातील शाखांच्या ठिकाणी, जसे पश्चिम विभागात पुणे, इंदोर, वडोदरा, अहमदाबाद, राजकोट.
वितरक याहून अधिक केंद्रे उघडू शकतात.
गुंतवणुक करणाराने या स्वीकार केंद्रात (कलेक्शन सेंटर) संबंधित शेअर / कर्जरोखे यासाठीचा आपला अर्ज व धनादेश देऊन त्यांची पावती घ्यायला हवी. या पावतीवर आणि अर्जावर एकच धनादेश अनुक्रमांक असतो. शेअर/कर्जरोखे या छापील अर्जाच्या तळाला पावतीसाठी जागां असते.
गुंतवणूकदार जेथे राहतो तेथे स्वीकार केंद्र नसल्यास आपला अर्ज आणि धनादेश रजिस्टर पोस्टाने वितरण दप्तरीकडे ( रजिस्ट्रार टू इश्यू) परस्पर पाठवू शकतो.

प्रश्न २) : सार्वजनिक वितरणाची अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख उलटल्यापासून किती दिवसात वाटपाचे माहितीपत्रक (अलोटमेंट लेटर) गुंतवणुकदाराला यायला हवे.
उत्तर : सेबीच्या २००० च्या अधिनियमानुसार कंपनीने आपल्या गुंतवणुकीच्या आमंत्रण पत्रकात संबंधित शेअर/कर्जरोखे वाटप अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या तारखेपासून ३० दिवसात करावयाचे कबुल केलेले असते. म्हणून या दिवसाच्या आतच ते मिळायला हवे.

प्रश्न ३ : गुंतवणुक अर्जदाराला शेअर/ कर्जरोखे वाटप ३० दिवसांनतर मिळालेच नाही आणि मुदतीच्या आत पैसे परत आलेच नाहीत तर काय करायचे?
उत्तर : असे झाल्यास ते पैसे अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या दिवसापासून १५ % व्याजासह परत करण्यास कंपनी/ प्रवर्तक सेबीला बांधलेला असतो.
सेबीच्या नियमानुसार व्यवस्थापक व्यापारी बँक वाटप पत्रे आणि गुंतवणुकीचे परतफेडीचे धनादेश पाठविण्याचे काम बघत असते. यामुळे शेअर/कर्जरोखे अर्जदार व्यवस्थापक व्यापारी बँकेकडे (लीड मेनेजर) तक्रार करू शकतात.
त्यानंतरही तक्रार निवारण झाले नाही तर स्टोक एक्स्चेंज मधील गुंतवणूकदार केंद्र (इन्व्हेस्टर्स सर्व्हिस सेल) येथे अर्ज करावा.

प्रश्न ४ : शेअर/कर्जरोखे वाटप पत्र आले, पण डिपोझिटरि कडून येणा-या पत्रकात शेअर/कर्जरोखेची नोंद झाली नाही तर काय करावे?
उत्तर : तशी नोंद न झाल्यास डिपोझिटरीकडे ते दाखवून विचारणा करावी.

प्रश्न ५ : लाभांशाचा धनादेश, प्राधान्य शेअरचे आवाहन पत्र( ऑफर फॉर राईट इश्यू ) किंवा बक्षीस शेअर अथवा कर्जरोख्यां वरील व्याज न मिळाल्यास काय करावे?
उत्तर : कर्जरोख्यावरील व्याजाचा दर आणि व्याज मिळण्याची तारीख आधीच ठरलेली असते. लाभांश मात्र कम्पनीच्या वार्षिक आमसभेत जाहीर व्हावा लागतो. व्याजाच्या तारखा आणि लाभांशाचे वितरण यावर गुंतवणूकदाराने लक्ष ठेवून असावे. बहुतांशी व्याजाचे किंवा लाभांशाचे धनादेश येतात पण काही कारणाने ते ठराविक मुदतीत न मिळाल्यास कंपनीच्या रजिस्ट्रार टू इश्यू कडे तक्रार करावी.
तेथे समाधान न झाल्यास स्टोक एक्स्चेंज मधील इन्व्हेस्टर्स सर्व्हिस सेल केंद्रात तक्रार करावी.

सेकंडरी शेअर बाजारात घ्यावयाची काळजी

१) सेबी मान्यताप्राप्त दलाल (ब्रोकर) किंवा सहाय्यक दलाल निवडून त्याच्याबरोबर शेअर बाजारातील सर्व प्रकारच्या व्यवहारांसाठी करार करावा.

२) दलालाला शेअर/कर्जरोखे यांच्या विक्रीचे आदेश देताना कंपनीचे नाव, कुठल्या दराने व्यवहार करावयाचा आहे आणि केव्हा करायचा आहे याबद्दल स्पष्ट सूचना देण्याची काळजी घ्यावी.

३) दलालाकडून प्रत्येक व्यवहाराच्या कराराची प्रत व्यवहाराचा आदेश दिल्यापासून २४ तासात मिळायला हवी. या करारात व्यवहाराचा आदेश, व्यवहाराची तारीख व वेळ, दर, दलाली आणि व्यवहार पूर्ततेचा क्रमांक ही माहिती दिलेली असते. करारावर दलालाची सही हवी. कराराच्या दर्शनी भागी संबंधित करार मुंबई परिसरात लवादाला पात्र असल्याचे स्पष्ट शब्दात लिहिलेले हवे.

४) संबंधित खरेदीतील शेअर/कर्जरोखे किंवा विक्रीच्या पैशाची यथायोग्य आवक संबंधित व्यवहार पूर्ततेच्या काळात होते की नाही, याबद्दल गुंतवणूकदाराने जागरूक रहायला हवे.

५) प्रत्यक्षात शेअर/कर्जरोखे प्रमाणपत्र घेऊन व्यवहार व्हायचा असल्यास राजशुल्क भरलेले हस्तांतर पत्र पुरे करून कंपनीकडे दर्ज करावे लागते. विसर्जित (डी मेट) शेअर/कर्जरोखे व्यवहारात असल्यास हे हस्तांतर कागदपत्र विरहीत आणि सत्वर होते.

वरील पैकी तक्रारी निर्माण झाल्यास इन्व्हेस्टर्स सर्व्हिस सेल (बी.एस.ई.) कडे तक्रार करावी.

(शेअर बाजाराची यथार्थ ओळख पुस्तकामधून साभार)

Share This Post

Post Comment