सोप्या भाषेत शेअर बाजार (भाग -१० ) – मितेश ताके
अनेक परिचीत, मित्र, नातेवाईक विचारतात की शेअर बाजारात सुरवात कुठून करू?
माझा सल्ला आहे की आधी स्वतःमध्ये गुंतवणूक करा! स्वतःचे ज्ञान वाढवा. त्यासाठी वेळ, पैसा आणि उर्जा खर्च करा.
शेअर बाजाराविषयीची १०-२० पुस्तके अभ्यासा. बाजाराविषयीची वृत्तपत्र, मासिके वाचा. तुमच्या ओळखीच्या ट्रेडींग करणाऱ्या लोकांना भेटा, मार्गदर्शन घ्या. काही कोर्स करा. वर्कशॉपमध्ये भाग घ्या. टि. व्ही.वर बिझनेस चॅनल पहा. ते लोक काय बोलतात ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्या गावात जर शेअर ब्रोकर असेल तर तेथे जाऊन बसा तेथे काय घडते ते फक्त पहा -ऐका. वेगवेगळ्या वेबसाईट/ ब्लॉगचा अभ्यास करा. इंटरनेटवरील शेअर बाजाराविषयी चर्चा करणाऱ्या मोफत कम्युनिटी/ ग्रुपचे सदस्य व्हा. जुन्या चर्चा वाचून काढा. नवीन चर्चेत भाग घ्या. गाजलेल्या गुंतवणूकदारांच्या/ ट्रेडर्सच्या मुलाकती वाचा/ ऐका. ते कसे घडले ते समजून घ्या. यु ट्यूबवर व्ही. डी. ओ. पहा. भरपूर चौफेर अभ्यास करा. मात्र कुठल्याही टिप्स देणार्याच्या नादी लागू नका.
आणि सुरवातीला पाच पैसेही लावू नका. जेव्हा तयारी झाली असे वाटेल तेव्हा आधी पेपर ट्रेडिंग करा. आणि मगच हळू हळू थोडे थोडे पैसे लावा. हे सायकल शिकण्यासारखे आहे. सुरवातीला घूढघे आणि ढोपर फुटणारच आहेत म्हणजे काही पैसे गमावणारच आहात हे लक्षात ठेवा. सायकल जमायला लागल्यावर वेगात चालवायचा विचार करा म्हणजेच खूप पैसे लावायचा विचार करा.
—————————-
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा –
https://www.facebook.com/StockMarketinSimpleMarathi
—————————-
Posted on एप्रिल 10, 2016
Leave a comment