शेअर बाजार म्हणजे शक्यतांचा खेळ आहे

 

शेअर बाजार म्हणजे शक्यतांचा खेळ आहे. सर्व जर-तरच्या गोष्टी असतात. नक्की काय घडेल कुणीच सांगू शकत नाही. मात्र ठोकताळे मांडता येतात.

आता अनेक वाचक विचारतात की सध्या ऑक्टोबर २०१७ मध्ये सेन्सेक्स ३२ हजारच्या दरम्यान आहे, तर अजून किती वर जाईल ?

या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी आपण काही ठोकताळे मांडू कदाचित आपल्याला उत्तर सापडेल. पण हे ठोकताळे मांडण्यापूर्वी तुम्हाला सेन्सेक्स म्हणजे काय ? निफ्टी म्हणजे काय ? निफ्टीचा पी/इ रेशो म्हणजे काय ? या गोष्टी माहित हव्यात. जर माहित नसतील तर कृपया या आधीचे लेख वाचावेत.

१० ऑक्टोबर २०१७ ला निफ्टीचा पी/इ रेशो होता २६.०२

१७ ऑक्टोबर २०१७ ला निफ्टीचा पी/इ रेशो वाढून झाला होता २६.५२

दोन्हीतील फरक आहे = ०.५०

१० ऑक्टोबर २०१७ ला सेन्सेक्स होता =३१,९२४. ४१

१७ ऑक्टोबर २०१७ ला सेन्सेक्स होता =३२,६३४.६३

दोन्हीतील फरक = ७१०.२२

१० ऑक्टोबर २०१७ ला निफ्टी होता = १००१६.९५

१७ ऑक्टोबर २०१७ ला निफ्टी होता = १०२३४.८५

दोन्हीतील फरक = २१७.९०

वरील आकडे पहिले की लक्षात येईल की जर निफ्टीचा पी/इ रेशो ०.५० ने वाढला तर सेन्सेक्स मध्ये साधारणतः ७१० ने आणि निफ्टी मध्ये साधारणतः २२० ने वाढ होते.

१९९९ पासूनचा जर इतिहास पहिला तर निफ्टीचा जास्तीत जास्त पी/ई रेशो झाला होता २८.४७ (११ फेब्रुवारी २०००)

इतिहास पाहता आता पण निफ्टीचा पी/इ रेशो जास्तीत जास्त २९ पर्यंत जाईल असे जर गृहीत धरले तर अजून निफ्टी च्या पी/इ रेशो मध्ये २.५ इतकी वाढ होऊ शकते कारण सध्या निफ्टीचा पी/इ रेशो आहे २६.५२

आणि जर निफ्टीचा पी/इ रेशो जास्तीत जास्त २.५ ने वाढणार असेल तर सेन्सेक्स मध्ये जास्तीत जास्त (२.५ X ७१० X २ ) ३५५० ने वाढ होऊन सेन्सेक्स होईल ३२६३४.६३ + ३५५० = ३६१८४.६३

आणि निफ्टीमध्ये जास्तीत जास्त (२.५ X २२० X २) ११०० ने वाढ होऊन निफ्टी होईल १०२३४. ८५ + ११०० = ११३३४.८५

मग मात्र त्यानंतर मार्केट कोसळेल !

वरील लेखात आकडेवारी जरा जास्तच झाली आहे पण त्याला पर्याय नाही. समजले नसेल तर परत वाचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा .

अभ्यासासाठी शुभेच्छा !

—————————-

Share This Post

Post Comment