संपादकीय

संपादकीय

‘शेअर मार्केट वृत्त’च्या वाचकांना संपादक म्हणून माझा मानाचा मुजरा
मी शेअर बाजाराला पूर्णत: वाहिलेल्या मराठी भाषेतील web site तमाम शेअर बाजारातील दर्दी मराठी वाचकांना सादर करताना खूप आनंदित आहे व मला त्याचा अभिमानसुद्धा आहे. अभिमान याकरिता की, इंग्रजीत शेअर बाजाराची माहिती देणारी ५ दैनिके आहेत. हिंदी भाषेतील एक दैनिक आहे. गुजराती भाषेत एक दैनिक आहे, परंतु मराठी भाषेतून शेअर बाजाराचे वृत्त देणारे एकही दैनिक नाही चांगली web site नाही . त्याची उणीव मी हि web site सादर करून भरून काढत आहे आणि मला त्याचाच अभिमान वाटत आहे.
ह्या web site ची काही वैशिष्ट्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो. त्याद्वारे तुम्हाला कळेल की, हे web site इतर शेअर बाजारविषयक माहिती देणा-या web site पेक्षा वेगळे व उजवे कसे आहे.
दैनिकामध्ये बातम्या असतात तशा शेअर बाजार विषयाशी निगडीत बातम्या आपल्या शेअर मार्केट वृत्त web site मध्ये सुद्धा आहेत, परंतु प्रत्येक बातमीच्या शेवटी त्या बातमीचा परिणाम कोणत्या शेअरवर किंवा कोणत्या सेक्टरवर होणार आणि त्यामुळे त्यांचे भाव वाढतील की पडतील याची नोट (टिप्स) असणार आहे. हे वेगळेपण याकरिता की बातम्या तर सर्वत्र समजतात त्याकरिता कित्येक न्यूज चैनेल आहेत, परंतु त्या बातमीचा परिणाम सांगणारे खूप थोडे असतात व शेवटी शेअर बाजार विषयी वाचणारा वाचक पेपर हा कोणते शेअर घ्यावेत व कोणते विकावेत याचा निर्णय घेण्याकरीताच पेपर विकत घेणार तेव्हा त्याची अपेक्षापुर्ति करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो.
आम्ही संपादकीय लिहिणार नाही. संपादकीय लिखाण म्हणजे जास्त शहाणे समजणारे व काय करावे व काय करू नये हे सांगणा-या शहाण्यांचा वर्ग आहे. त्याचा अनेकदा काहीच उपयोग वाचकांना नसतो. जे अनुपयोगी आहे ते वाचकांना द्यावयाचे नाही हे आमचा वर्तमानपत्राचे एक वैशिष्ट्य आहे. त्यानुसार संपादकीय या वर्तमानपत्रातून नसणार, तर त्या ऐवजी ‘भरताच्या लेखणीतून’ हे दैनिक सदर असणार आहे. भरत ही व्यक्ती शेअर बाजाराची आजच्या घडीची सर्वोत्कृष्ट जाणकार आहे व त्यांचे लिखाण आम्ही तुंम्हाला सादर करीत आहोत याचा आह्माला आनंद आहे.
भरतचे लिखाण तुम्हाला नक्कीच आवडेल व त्यापासून तुम्हाला निश्चित फायदा होईल अशी आम्हाला आशा आहे.
शेअर बाजाराविषयीचा पेपर, वाचक कोणते शेअर घ्यावेत व कोणते विकावेत यांचा निर्णय घेण्यासाठी घेतो. त्यांची ही गरज ओळखून आम्ही शेवटच्या पानावर टिप्स हे पान सादर करत आहोत. याचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या टिप्सद्वारे कंपनीची माहिती तुम्हाला मिळेल बाकी सर्व पेपर टिप्स देतात परंतु कंपनीची माहिती व टिप्स का देण्यात येत आहे याची कारणे सांगत नाहीत, परंतु आपल्या शेअर मार्केट वृत्त ची टिप्स कंपनीची माहिती व सूचना असेल. टिप्स सर्व्हिस करीता शेअर बाजारात व्यवहार करणारे हजारो रुपये मोजतात. त्या टिप्स कारणासहित आम्ही तुम्हाला फुकट देणार आहोत.
इतर सर्व पेपर काल बाजारात काय घडले व काय बिघडले याची माहिती आकडेवारी व डेटा द्वारे देतात परंतु तो डेटा कसा चेक करायचा व ती आकडेवारी कशी समजून घ्यायची ते सांगत नाहीत, परंतु आमच्या पेपरात आम्ही ती उणीव दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत व हे सुद्धा आमच्या पेपरचे एक वेगळेपण आहे.

Share This Post

Post Comment