सुसंघटीत टीमचे महत्व

सुसंघटीत टीमचे महत्व

सुसंघटीत टीमचे महत्व

अनेक कामे अशी असतात की व्यक्ती स्वत: ती सहज करू शकतो. मात्र एका टीममध्ये केल्याने अधिक लवकर आणि दर्जेदार कामे होतात. त्याचबरोबर व्यक्तीने त्याची क्षमता, टीममधील सहका-यांच्या गुणांशी – क्षमतेशी जोडली तर मोठा परिणाम प्राप्त होतो.
टीममध्ये काम केल्यामुळे फार फायदा होतो. एकाने केलेले काम दुसरा आपल्या क्षमतेवर पुढे घेऊन जातो. टीममध्ये सर्वजण एक-दुस-यावर अवलंबून असतात.
अशा टीम जेवढ्या सुसंघटीत असतील तेवढे कार्य चांगले होते. अशी चांगली व कार्यक्षम टीम बनवणे हे एका कुशल नेत्याचे कार्य व कौशल्य असते.

टीमची काही वैशिष्ट्ये
१) एक सामुहिक उद्देश :
टीममधील सर्व सदस्यांना हे ठावूक असते की आपण कोणत्या उद्देशाने काम करीत आहोत आणि त्यातील प्रत्येकाची व्यक्तिगत कोणती जबाबदारी आहे ते चांगले महित असते. त्यामुळे एखाद्या अडचणीने वा लहानशा वादळाने टीममध्ये सहजासहजी गोंधळ उडत नाही. टीम कोलमडत नाही.

२) सहयोग :
टीमचे सर्व सदस्य एकमेकांना मदत करतात. त्यानी एकमेकांची काळजी घ्यावी. केवळ आपल्या एकट्याचा विचार करू नये. दुस-यांचे गुण आपल्यातही यावेत यासाठी चांगल्या मनाने प्रयत्न करावा.

३) समर्थन किंवा विश्वास :
टीममधील सदस्य एकमेकांवर विश्वास ठेवतात. ते एकमेकांप्रती संशय व्यक्त करीत नाहीत.
कामाचे ओझे, ज्ञानाची कमतरता, आदी कमतरता आपल्या सहका-यात असेल तर ते ओळखावे आणि त्याला इतरांनी मदत करावी. एकमेकांना विश्वास दाखवून एकमेकांची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी संघटितपणे मदत करतात.

४) मुकाबला :
जेव्हा टीममधील लोक एकमेकांना प्रतिक्रिया देतात तेव्हा टीममध्ये मतभेद आणि गैरसमज होऊ लागतात.
सुसंघटीत टीममध्ये असे गैरसमज दाबून ठेवत नाहीत तर ते समोर आणून उघड चर्चा करण्यात येते. कारण सदस्यांमध्ये एकमेकांवर विश्वास असला तरच काम चांगले होऊ शकते.

५) खुलेपणा :
टीमच्या सदस्यांमध्ये खुलेपणा असला पाहिजे. सदस्याने स्वत:चे ठाम मत मांडणे आणि स्वत:ला प्रसंगानुसार व्यक्त करणे आवश्यक असते.
आपल्या विरोधी मते असणा-या सदस्यांची मते ऐकण्याची व त्यांच्याशी थेट संवाद साधण्याची कुवत असली पाहिजे. खुलेपणा शिवाय मुकाबला व प्रगती शक्य होत नाही.

६) प्रक्रिया राबविणे :
टीममध्ये कशाप्रकारे काम केले जाते ते सदस्याला माहीत असावे.
कोणालाही लिहून काम करण्याचे आदेश द्यायची गरज नसली पाहिजे.
प्रत्येकाचे नियोजित काम माहित असल्याने वेळ वाया जात नाही शिवाय कामात अडचणी निर्माण होत नाहीत.

७) उपयुक्त नेतृत्व :
एका सुसंघटीत टीममध्ये असणारे नेतृत्व त्यातील सदस्यांना प्रेरणा देणारे वा त्यांच्यासाठी उपयुक्त असले पाहिजे.
नेतृत्व समजदार आणि योग्य असेल तर टीममधील सदस्यांमध्ये त्याचे गुण विकसित होतात.
सदस्यांना येणा-या समस्या सोडविणे आणि वाद संपविणे व सर्वाना एकत्रित बांधून ठेवणे या सा-या गोष्टी सांभाळणे आवश्यक असते. किमान तेवढे गुण टीमच्या नेतृत्वात असले पाहिजेत.

८) नियमित समीक्षा :
टीमच्या सदस्यांनी एकत्रित येऊन लीडर सह वरिष्ठांशी चर्चा करून होणा-या कामांची समीक्षा करावी.
आखलेला उद्देश साध्य होणे, त्यात आलेल्या अडचणी दूर करण्यासाठी, चुका दुरुस्त करण्यासाठी तसेच कार्यात अधिक वाढ करण्यासाठी एकत्रित बैठक किंवा समीक्षा आवश्यक आहे. मात्र यावेळी सर्व सद्स्यानी मोकळेपणे भाग घेतला पाहीजे आणि आपले विचार मनमोकळेपणे मांडले पाहिजेत. सूचना दिल्या पाहिजेत.

* अशा गुणांमुळे एखादी टीम चांगले कार्य करू शकते. शिवाय त्यांच्या कार्याचा गुणात्मक दर्जा वाढत असतो.
* कोणत्याही मोठ्या व्यवस्थापनात टीमचे गुण येण्यासाठी कर्मचा-यांना विशेष ट्रेनिंग दिले जाते ते याच करणासाठी. हा एक व्यक्तिमत्व विकासाचा महत्वाचा भाग आहे. त्याचा फायदा कर्मचारी, टीमला होतोच शिवाय उद्योगाला किंवा संस्थेला सर्वाधिक फायदा होत असतो.
* एखाद्या व्यवस्थापनात अनेक टीम असू शकतात. आवश्यकता असल्यास अशा अनेक टीमचे एकत्रीकरण करून एक मोठी टीम बनवता येते. कार्यालयीन प्रमुख पदाधिकारी त्याचा लीडर बनविला जातो. मात्र त्यांच्या हाताखाली अनेक लहान मोठ्या टीम अस्तित्वात असतात.
* टीममध्ये चांगले काम करण्यासाठी ८ ते १५ जणांची टीम असावी म्हणजे त्यामध्ये चांगले को-ऑर्डिनेशन करता येते. सर्वाना एकमेकांना संभाळणे सोपे जाते.
* टीममध्ये विविध विचार, योजना, कलागुण यांची देवाणघेवाण करता येते. त्यातून एकमेकांचा विकास साधता येतो.

Share This Post

Post Comment