स्टॉपलॉस

स्टॉपलॉस

सोप्या भाषेत शेअर बाजार (भाग -९ ) – मितेश ताके

शेअर ट्रेडिंग मध्ये प्रत्येक ट्रेडचा शेवट पुढील चार गोष्टी पैकी एक होत असतो –
१) थोडा नफा
२) भरपूर नफा
३) थोडा तोटा
४) प्रचंड तोटा

यापैकी फक्त शेवटची गोष्ट घडू द्यायची नाही मग लाँग टर्म मध्ये तुम्ही यशस्वी ट्रेडर बनताल आणि भरपूर नफा कमावताल. आता ही चौथी गोष्ट कशी टाळायची तर त्यासाठी फक्त एकच उपाय आहे तो म्हणजे – “स्टॉपलॉस” वापरणे.

आता परत एकदा स्टॉपलॉस समजून घेऊ –
समजा एक शेअरचा भाव आता १०० रु आहे आणि मला “टेक्निकल अॅनॅलीसीस” मुळे असे वाटते की लवकरच त्याचा भाव १२० रु (२०% वाढ ) होईल. मग माझे टार्गेट झाले १२० रु. पण हा शेअर बाजार आहे येथे कधीपण काहीही घडू शकते, जर अपेक्षेच्या विरुध्द घडले आणि भाव खाली खाली जायला लागला तर ……।

तर ५% पेक्षा जास्त तोटा स्वीकारायचा नाही हे पण आधीच ठरवायचे. याला म्हणतात “स्टॉपलॉस”! या उदाहरणात ९५ रु हा आपला “स्टॉपलॉस” असेल. जर भाव ९९ रु झाला तर वाट पहा! ९८-९७-९६ झाला तरी वाट पहा! विकू नका भावात वाढ होऊन १२० रु मिळू शकतात.

मात्र ९५ झाला रे झाला की वाट पाहणे थांबवा आणि त्वरित विकून टाका कारण तो खाली खाली जात थेट १०-२० रु पण होऊ शकतो. अशी खूप उदाहरणे घडलेली आहेत.

विना ब्रेकची गाडी चालवाल तर अपघात निश्चित आहे आणि “स्टॉपलॉस” हा शेअर बाजारातील ब्रेक आहे जो जीवघेणे अपघात टाळतो, कंगाल होण्यापासून वाचवतो.

—————————-
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा –
https://www.facebook.com/StockMarketinSimpleMarathi
—————————-

Posted on एप्रिल 9, 2016
Leave a comment

Share This Post

Post Comment