अजय वाळिंबे

सुमारे ३४ वर्षांपूर्वी म्हणजे १९८६ मध्ये वरिंदर गुप्ता आणि राजिंदर गुप्ता (ट्रायडंट लिमिटेडचे प्रवर्तक) यांनी अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड उत्पादन सुविधेसाठी गुंतवणूक केली. आयओएलची निर्मिती सुविधा पंजाबच्या बरनाला येथे असून त्यांची वार्षिक उत्पादन क्षमता १,२७,८२० मेट्रिक टन आहे. आयओएल केमिकल्सच्या प्रमुख उत्पादनांत इथाइल अ‍ॅसिटेट, अ‍ॅसिटिल क्लोराइड, आयसो-ब्यूटिल बेंझिन आदी तसेच फार्मास्युटिकल उत्पादने आयबुप्रोफेन, मेटाफॉर्मिन इ.चा समावेश होतो. कंपनीची आयबुप्रोफेनची वार्षिक उत्पादन क्षमता १२,००० मेट्रिक टन्स आहे. विविध ग्राहकांच्या गरजेनुसार कंपनी विविध केमिकल्सच्या उत्पादनात कार्यरत असून ही उत्पादने फार्मास्युटिकल, फ्लेक्झिबल पॅकेजिंग, पेंट आणि लॅमिनेशन, शाई, कीटकनाशके इत्यादी मुख्य औद्योगिक क्षेत्रांची पूर्तता करतात.

आयओएलची ५० हून अधिक देशांमध्ये बाजारपेठ असून एकूण उलाढालीत निर्यातीचे योगदान एकूण विक्रीच्या ३४ टक्के आहे. कंपनीचे परदेशी ग्राहक स्पेन, ब्राझील, हंगेरी, यूएसए, इंडोनेशिया, बांगलादेश इत्यादींसह अनेक देशांमध्ये पसरलेले आहेत.

आयबुप्रोफेन हे कंपनीचे प्रमुख उत्पादन आहे ज्याने काही वर्षांच्या कालावधीत कंपनीच्या कमाईत ५० टक्क्यांपेक्षा जास्त योगदान दिले आहे. आयओएलची आयबूप्रोफेनची एकूण वार्षिक उत्पादन क्षमता १२,००० टन असून एपीआयच्या जागतिक मागणीच्या ती २९ टक्के इतकी आहे.

गेली काही वर्षे कंपनी सातत्याने उत्तम कामगिरी करत असून आयओएल आता जवळपास कर्जमुक्त झाली आहे. कंपनीने सप्टेंबर २०२० अखेर संपलेल्या तिमाहीचे निकाल नुकतेच जाहीर केले आहेत. या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने ५३३ कोटी (गेल्या वर्षी ४४९ कोटी) रुपयांच्या उलाढालीवर १२७ कोटी (८८ कोटी) रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. कंपनीच्या उत्तम कामगिरीमुळे साहजिकच कंपनीचा शेअरदेखील ९०० रुपयांवर जाऊन आला. सध्या केमिकल्स आणि फार्मा क्षेत्रातील कंपन्या तेजीत असून आयओएलदेखील त्याला अपवाद नाही. मात्र गेल्या काही दिवसांत अल्प ‘बिटा’ असलेला हा शेअर ६५०-७०० रुपयांच्या आसपास आला असून तो योग्य वेळी आणि टप्प्याटप्प्यांत खरेदी केल्यास वर्षभरात चांगली कमाई करून देऊ शकेल.

आजच्या परिस्थितीत ‘माझा पोर्टफोलियो’मध्ये सुचविलेले शेअर्स हे तुम्हाला खालच्या भावात मिळू शकतात. त्यामुळे गुंतवणूक एकाच वेळी न करता टप्प्याटप्प्यात करावी.

आयओएल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स लि.

(बीएसई कोड – ५२४१६४)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ६९७.४०

स्मॉल कॅप

प्रवर्तक : वरिंदर गुप्ता

उत्पादन : केमिकल्स आणि फार्मा

बाजार भांडवल : रु. ४,०९४ कोटी

वर्षभरातील उच्चांक/नीचांक : रु. ८९९/१४६

भागभांडवली भरणा : रु. ५८.७१ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ४३.६९

परदेशी गुंतवणूकदार ६.४०

बँक/ म्यु. फंड/ सरकार ०.०२

इतर/ जनता ४९.८९

पुस्तकी मूल्य : रु. १८६

दर्शनी मूल्य : रु. १०/-

लाभांश : ३०%

प्रति समभाग उत्पन्न : रु. ७५.४२

पी/ई गुणोत्तर : ९.२

समग्र पी/ई गुणोत्तर : ३६.२

डेट इक्विटी गुणोत्तर : ०.०२

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ६३.७

रिटर्न ऑन कॅपिटल : ६८.९

बीटा : ०.५

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

२. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

THANKS LOKSATTA

Share This Post

Post Comment