<img src="https://sharemarketvrutt.com/wp-content/uploads/2018/09/3-300x168.jpg" alt="" width="300" height="168" class="alignnone size-medium wp-image-175" / आज फेसबुक व ट्विटर ने ट्रम्पतात्याची अकाउंट अनिश्चित कालासाठी बंद केलीयेत... जाता जाता माय बास्ट फ्रांड डोलांड, भारताची ठासुन गेलाय हे त्या कॉमन हाऊसमध्ये तिरंगा घेवुन शिरणा-या दंगलीखोरास माहीत नसावे. तसं आर्थिक बाबतीत अमेरिका हा कोणाचाच मित्र नाही आणि भारताचा तर नाहीच नाही, ९० कोटी जनसख्येंची बाजारपेठ म्हणजे मजाक नसतो, पण गुंतवणुकदारांना स्थिरता हवी असते...ती सध्या भारतात नक्कीच नाही. या बाबतीत चीनच धोरण बरं आहे, यु डील विथ मी, आय डील विथ मी, आर्थिक बाबतीत अमेरिकेसारखी दादागिरी करत बसत नाही ते... असो, विषय आहे अमेरिकेने भारताला करन्सी मॉनिटरींग मध्ये टाकल्याचा...खरं तर यामुळे काही निर्बंध ई येत नसतात, पण पुढील दोन महिन्यात त्यांचा तो रिपोर्ट घेतील आणि ठरवतील. काय असते करन्सी मॉनिटरींग ? जेव्हा जेव्हा अमेरिकेला असे लक्षात येते की त्यांची करन्सी ( डॉलर्स ) एखादया देशाकडे अनाधिकृत रित्या अधिकची जमा होतेय तेव्हा ते या सगळ्या प्रकारच्या आर्थिक घडामोडींच्या उत्खननाच्या हात धुवुन मागं लागत्यात. या आधी २०१७ ला ही टाकलं होतं, पण नंतर ट्रम्प मध्ये काही सुप्त वाटाघाटी झाल्या आणि काढलं... पण या पेक्षा बेअक्कल तो तिरंगा घेवुन शिरणारा आहे आणि भक्त...खरतरं आपल्या लक्षात हे यायला हवं की डॉलरचा भाव ईतका ऑल टाईम हाय असताना भारत सरकार डॉलर विकायचे सोडुन खरेदी का करत आहे ? आणि कशासाठी ? ते ही अर्थव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले असताना ?? तुम्ही म्हणाल नाही, ही परदेशी गंगाजळ ट्रेडनुसार झालीये, तर भावांनो, मला एखादी तरी झालेली मोठी डील आठवुन सांगा बरं...( नमस्ते ट्रम्प शिवाय 😜 ) पण चांगल्या चार पाच डील मी चायना बरोबर मी सांगु शकतो. अर्थात जर पाकिस्तान, बांग्लादेश वा ईतर शेजार-पाजारी काही कांदे,बटाटे, साखर विकुन कमवले असतील तरी ते पार करन्सी मॉनीटरींगपर्यंत वाढणं शक्य नाही किमान हे तरी त्या तिरंगा घेवुन शिरलेल्या दंगेखोराने सांगायला हवे .. पुन्हा असो... वाश्या हा लेख सुवास सालवे यांच्या fb एकाउंट मधून घेतला आहे । या लेखातून डॉलर वर व आमेरिका च्या निर्बन्धचा भारतावर काय परिणाम होईल व त्या वर शेअर मार्केट कसे रिऐक्शन देईल या करिता टाकला आहे । चला गेस करा।